दादरमधील फेरीवाल्यांच्या (Dadar Hawker) वाढत्या अतिक्रमणामुळे जनता त्रस्त असतानाच आता दादरमधील मराठी फेरीवालेच परप्रांतिय फेरीवाल्यांमुळे अधिक त्रासलेले आहेत. एकाबाजुला शिस्तीने फेरीचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मराठी फेरीवाल्यांना आता परप्रांतिय फेरीवाल्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पादचाऱ्यांना तसेच वाहनांना जागा ठेवून स्वयंशिस्तीने व्यवसाय करत असला तरी परप्रांतिय मात्र हा नियम मोडून व्यवसाय करत पदपथासह रस्ताही अडवून बसत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होता. त्यामुळे याचा परिणाम महापालिका व पोलिसांच्या कारवाईत होतो, आणि त्यामुळे शिस्तीने व्यवसाय करणाऱ्या मराठी फेरीवाल्यांनाही याचा फटका बसू लागला आहे. (Dadar Hawker)
दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला केशवसुत उड्डाणपुलांखाली जागांसह रानडे मार्ग, छबिलदास गल्ली, डिसिल्व्हा रोड आणि जावळे मार्ग तसेच एन सी केळकर रोड आदी मार्गांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची संख्या वाढलेली पहायला मिळत आहे. यासर्व मार्गावर रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या अंतरावर कारवाई केशवसूत उड्डाणपुलाखालील भागात तसेच इतर जागांमध्ये बसणाऱ्या फेरीवाल्यांवर सरसकट कारवाई करण्याचे अधिकार असतानाही महापालिका प्रशासन (Municipal Administration) आणि पोलिसांकडून संरक्षण दिले जाते. परंतु मानवतेच्या दृष्टीकोनातून या फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याची मुभा दिली जात असली तरी त्यांच्या बेशिस्त वर्तनामुळेच नागरीक अधिक त्रस्त झालेले आहेत. (Dadar Hawker)
(हेही वाचा – Deep Cleaning Drives : मुंबईतील उद्यान आणि क्रीडांगणे स्वच्छ राखण्याकडे महापालिकेचा कल)
दादरमधील रानडे मार्ग, डिसिल्व्हा रोड आणि जावळे मार्गासह छबीलदास गल्लीतील दीडशे मीटरच्या अंतरावर व्यवसाय करणारे ९० टक्के फेरीवाले हे परप्रांतिय आहेत. परंतु या सर्व परप्रांतिय फेरीवाल्यांकडून पदपथासह रस्त्यांवरही अतिक्रमण केले जाते. महापालिका आणि पोलिसांची कारवाई ही नागरिकांच्या तक्रारींनंतर होते. परंतु जर आपण लोकांना आणि वाहनांना जागा मोकळी ठेवून व्यवसाय केल्यास कुणालाही त्रास होणार नाही आणि फेरीवाल्यांवरही महापालिका व पोलिसांची (Police) कारवाई होत नाही.
परंतु परप्रांतिय फेरीवाले हे पदपथावर जास्त जागा अडवून बसतातच शिवाय रस्त्यावर बसताना पदपथाच्या बाजुला टेकून न बसताना पदपथ आणि रस्ता यामध्ये दोन ते तीन फुटांची जागा सोडून पुढे धंदे थाटतात. परिणामी हे सर्व धंदे रस्त्याच्या दोन्ही बाजुला अशाप्रकारे मांडले गेल्याने रस्त्यावरुन तसेच पदपथावरून लोकांना चालताना अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन आम्ही जेव्हा संबंधित फेरीवाल्याला जागा सोडून धंदा लाव असे जेव्हा सांगतो, तेव्हा तो फेरीवाला आम्हाला शिकवतो आणि तुम्हाला काय करायचे आहे, कारवाई झाली आम्ही बघून घेऊ, माझा माल पकडून नेतील, तुमचे काय जाते असा सवाल करतात, असे मराठी फेरीवाल्यांचे म्हणणे आहे. (Dadar Hawker)
यातील काही परप्रांतिय फेरीवाले आमचे ऐकतात. जे पूर्वीपासून व्यवसाय करतो ते शिस्तीने व्यवसाय करतात, परंतु काहींनी भाड्याने जागा घेऊन व्यवसाय करण्यास सुरुवात केली, त्याठिकाणी बाहेरील मुले आणून व्यवसाय करण्यास उभी केली जातात, हीच मुले उर्मटपणे वागतात आणि पदपथ आणि रस्त्यावरही अतिक्रमण करतात असे मराठी फेरीवाल्यांचे (Dadar Hawker) म्हणणे आहे. आम्हाला शिस्तीने व्यवसाय करायचा आहे, कारवाईमुळे आम्हाला व्यवसाय करता येत नाही, दिवसाचा धंदाही होत नाही. पण जर आपण शिस्तीने व्यवसाय केला तर सर्वांना व्यवसाय करता येऊ शकतो, हे बाहेरुन आलेल्या फेरीवाल्यांना समजत नाही आणि त्यातून त्यांच्यासोबत आमच्यावरही कारवाई होते, असे मराठी फेरीवाल्यांचे म्हणणे आहे. (Dadar Hawker)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community