- विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादरमधील फेरीवाला पूर्वी मराठी माणूसच होता. परंतु आता चित्र बदलत चालले असून दादरमधील फेरीचा व्यवसाय हा परप्रांतियांच्या हाती गेला असून मराठी माणसांच्या आणि स्थानिकांच्या व्यवसायावर महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस कारवाई करत आहेत, आणि दुसरीकडे भाडोत्री फेरीवाले मात्र बिनधास्तपणे व्यवसाय करत आहे. मराठी गरीब कुटुंबाला देशोधडीला लावून परप्रांतिय फेरीवाल्यांना संरक्षण देणाऱ्या महापालिका प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांचा तीव्र निषेध दादरमधील मराठी फेरीवाल्यांकडून होत आहे. (Dadar Hawker)
दादरमधील फेरीवाल्यांवर मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कारवाईमुळे मराठी तसेच स्थानिक फेरीवाले त्रस्त आहेत. त्यातच सोशल माध्यमांवर दादरमधील फेरीचा व्यवसाय करणारे आधारस्तंभ संस्थेचे सतीश थोरात यांची पोस्ट व्हायरल झाली आणि त्यात त्यांनी सकाळच्या वेळेत होणारा व्यवसाय आणि प्रत्यक्षात दिवसभर व्यवसाय करणाऱ्या मराठी माणसांवर कशाप्रकारे कारवाई याबाबत लक्ष प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. शनिवारी सकाळी साडेसहा वाजता प्रत्यक्ष पाहणी आणि त्याच्या काढलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी सेनापती बापट मार्गावरील कामत हॉटेलपासून ते झारापकर क्लासेसपर्यंत बसलेल्या परप्रांतिय फेरीवाल्यांकडून कशाप्रकारे व्यवसाय केला जातो आणि त्यावर कशाप्रकारे कारवाई केली जात नाही याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. (Dadar Hawker)
(हेही वाचा – चित्रपट दिग्दर्शक Shyam Benegal यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन)
या पोस्टमध्ये थोरात म्हणतात की, सेनापती बापट मार्ग ते कामत हॉटेल ते झारापकर क्लासेस या परिसरात केशवसूत उड्डाणपुलावर अवैधपणे परप्रांतियांचे वर्चस्व निर्माण झालेले आहे. आज मराठी माणूस दादर पश्चिम येथून हद्दपार झाला आहे का असा सवाल करत दादरमध्ये पूर्वी मराठी माणूस भाजीचा व्यवसाय करत होता, आज परिस्थिती वेगळी आहे. कारण जी-उत्तर विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलेले नाही. अजून या ठिकाणी परप्रांतीय व्यक्ती हे या परिसरात हप्ता देत आपले दादर पश्चिम भागात वर्चस्व निर्माण करत आहे. याच ठिकाणी पहाटे केशवसूत उड्डाणपुलाखाली फुलमार्केट ते सुविधा शोरुम या परिसरात सर्व गाळ्यांमध्ये चोरीची विजेची जोडणी घेत व्यवसाय केला जात आहे. (Dadar Hawker)
त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात आहोत का यूपीत काही समजत नाही. अजून खूप काही बोलावस वाटत, पण आता बोलणार नाही. आता कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. जेणेकरून या दादर पश्चिम सेनापती बापट मार्ग मोकळा झाला पाहिजे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, प्रशासनाने स्टेशन परिसरामध्ये कारवाई अपेक्षित आहे. परंतु कारवाई स्टेशन पासून दूर म्हणजे जिथे मराठी बांधव व्यवसाय करतात, त्यांच्यावरच केली जाते, असा आरोप त्यांनी केला आहे. (Dadar Hawker)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community