Dadar Hawkers : रोहिंग्या मुसलमान फेरीवाल्यांच्या शोधात भाजपा

329
Dadar Hawkers : रोहिंग्या मुसलमान फेरीवाल्यांच्या शोधात भाजपा
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या परिसरात सध्या मुस्लिम फेरीवाल्यांची संख्या झपाट्याने वाढत असून या मुस्लिम फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशी मुसलमानांचा शोध घेण्यास भाजपाकडून प्रयत्न सुरु आहे. सलग दोन दिवस दादर पश्चिम रेल्वे स्थानकांशेजारील प्रत्येक फेरीवाल्यांची झाडाझडती घेतली जात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दादर रेल्वे स्थानक परिसरात बांगलादेशी मुस्लिम रोहिंग्यांना थारा द्यायचा नाही असाच निर्धार भाजपाच्या माहिम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर आणि त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतला आहे. भाजपाच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता पोलिसांनीही फळांची विक्रेत्या करणाऱ्या बंगाली मुस्लिमांना हटकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, जोवर या परिसरातील शेवटचा रोहिंग्या मुसलमान निघून जात नाही तोवर आपले हे आंदोलन सुरुच राहिला असा इशारा तेंडुलकर यांनी दिला आहे. (Dadar Hawkers)

दादर पश्चिम येथील फेरीवाल्यांविरोधातील मोहिमेमध्ये वाहतूक पोलिसाला जाब विचारल्याबद्दल काही मुस्लिम फेरीवाल्यांनी भाजपाच्या माहिम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांना खोट्या पोलिस केसमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही काळ निवडणुकीमुळे थांबलेली मोहिम अक्षता तेंडुलकर यांनी पुन्हा हाती घेतली आहे. गुरुवारी सकाळी दादर पश्चिम येथील केशवसूत उड्डाणपुलाखाली जागेत व्यवसाय करणाऱ्या मुस्लिम फेरीवाल्यांना हटकून त्यांची झाडाझडती घेण्याचा प्रयत्न केला आणि याठिकाणी कोणत्याही परिस्थितीत मुंबईबाहेरील मुस्लिम आणि बांगलादेशी मुसलमानाने व्यवसाय करू नये अशाप्रकारचा निर्धार केला असून यापुढे एकाही रोहिंग्या मुसलमानाला दादरमध्ये थारा देणार नाही असा निर्धार केला. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पहाटेही अक्षता तेंडुलकर यांनी दादरमध्ये ठाम मांडून फळ विक्रेत्यांना पकडून त्यांना पोलिसांच्या मदतीने व्यवसाय करण्यास मज्जाव केला. त्यामुळे अखेर पोलिसांनीच फेरीवाल्यांना हटवून लावले. (Dadar Hawkers)

(हेही वाचा – CC Road : प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची देखरेख, तरीही सिमेंट काँक्रिटची कामे निकृष्ट दर्जाची)

याबाबत अक्षता तेंडुलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दादर भागामध्ये ज्याप्रकारे मुस्लिम फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे ही चिंतेची बाब असून यामध्ये सर्वांत जास्त मुस्लिम हे बांगलादेशी रोहिंग्यो आहेत अशी माहिती मिळत आहे. तसेच आता दिसूनही येत आहे. फळ विक्रेते हे रोहिंग्या मुसलमान असून शुक्रवारी सकाळी जो फळांचा ट्रक आला होता त्यातही मुस्लिमच होते. आम्ही ट्रक पकडणार हे लक्षात आल्यानंतर त्यातील माणसे पळून गेली. या सर्व मुस्लिम रोहिंग्यांना आणून व्यवसायाला उभे केले जात असून हे स्वस्तात फळे विकत असून यांच्याकडून यांचे एक जाळे पसरवण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे पहाटेपासून जे फेरीवाले व्यवसाय करत आहेत त्या सर्व फळ विक्रेत्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी तेंडुलकर यांनी केली आहे. (Dadar Hawkers)

दादर पश्चिम येथील केशवसूत उड्डाणपुलाखालील जागा आणि रेल्वे स्थानकाचा प्रवेशद्वार हा मुक्त राहावा. याठिकाणी एकही फेरीवाला बसवू नये. सध्या याठिकाणी व्यवसाय करत असलेले फेरीवाले बेस्ट विजेची चोरी करत असून याचा फटका सर्वसामान्य जनतेला होत आहे. त्यामुळे जर गाळ्यांमध्ये व्यवसायच करायला द्यायचा असेल तर फक्त आणि फक्त महिला बचत गटांच्या महिलांना दिला जावा, जेणेकरून त्या महिलांना तिथे व्यवसाय करता येईल. शिवाय या महिला बचत गटांच्या संस्थांकडून शिस्तीने व्यवसाय केला जाईल, जेणेकरून गाळ्यांमधून जाताना कोणताही त्रास होणार नाही आणि जाता येता प्रवाशांना सहज आपल्या आवश्यक वस्तूंची खरेदीही करता येईल. नव्हेतर गावातील भाज्यांची विक्री करणाऱ्या महिलांना याठिकाणी रांगेत व्यवसाय करण्यास दिले जावे. त्यांच्या व्यतिरिक्त जर दुसरे कुणी करत असेल तर त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशीही सूचना तेंडुलकर यांनी केली आहे. (Dadar Hawkers)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.