- विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला असलेल्या एम. सी. जावळे मार्गावर जिथे कोणे एकेकाळी एकही फेरीवाला (Hawkers) नव्हता, तिथे आता रस्ता आणि पदपथ फेरीवाल्यांनी व्यापून गेला आहे. सन २०१४ नंतर या रस्त्यावर फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे या वाढत्या फेरीवाल्यांमुळे या मार्गावरून वरळीला जाणारी बस वाहतूक आणि येथून जाणाऱ्या शेअर टॅक्सी प्रवासासाठी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार दादरमध्ये फक्त रानडे मार्ग, डिसिल्वा मार्ग आणि एन सी केळकर मार्गावरच फक्त पूर्वी फेरीवाले (Hawkers) असायचे. कबुतर खाना गल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावळे मार्गावर पूर्वी फेरीवाले नव्हतेच. सन २०१४ नंतर या मार्गावर फेरीवाले दिसून आले आणि कोविड नंतर ही संख्या अधिक वाढली. हे फेरीवाले आता एवढेच रस्त्यासह पदपथही काबिज करू लागले असून या मार्गावरून रेल्वे स्टेशन गाठणे म्हणजे प्रवाशांसाठी एक दिव्य ठरत आहे.
(हेही वाचा – Nashik: नाशकात अपघातांची मालिका सुरूच; दोघांचा मृत्यू)
जावळे मार्गावर गोपाळकृष्ण बार पासून शेअर टॅक्सीची सुविधा आहे. परंतु संध्याकाळी ही सुविधा कबुतर खान्यापासून दिली जाते तर सिद्धीविनायक मंदिरापर्यंतची सुविधाही कामत हॉटेलपासून सुरु असते. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपासून केशवसुत उड्डाणपुलापासून बसची सुविधा आहे. परंतु याठिकाणी मोठ्याप्रमाणात फेरीवाले असल्याने बसला वळण घेणेही कठिण होते. तसेच याठिकाणी टॅक्सीची सुविधा नसल्याने प्रवाशांना कबुतर खान्याच्या पुढे येऊन टॅक्सी शोधावी लागते. तसेच संध्याकाळच्यावेळी फेरीवाल्यामुळे (Hawkers) बसला आतील बाजूस जाण्यास अडचण येते, परिणामी वाहतूक कोंडी होते आणि यामुळे शेअर टॅक्सीला विलंब होत असल्याने त्यासाठी प्रवाशांच्या रांगा अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचली जाते.
तसेच कबुतर खाना परिसरात एकप्रकारे खाऊ गल्लीच बनली असून याठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच हातगाड्या मोठ्याप्रमाणात लागल्या आहेत. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, याठिकाणी काही महिला फळ विक्रीच्या व्यवसाय करतात, तसेच काही मराठी फेरीवाले (Hawkers) असले तरी ८० टक्क्यांपर्यंत येथील फेरीवाले हे भाडोत्री असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जावळे मार्गावर जिथे फेरीवाले नव्हते, तिथे आता फेरीवाले दिसून येत असल्याने महापालिकेने जर योग्यवेळी कारवाई केली तर याठिकाणी बस आणि टॅक्सीची सुविधा प्रवाशांना चांगल्याप्रकारे मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community