दादरमधील वाढत्या फेरीवाल्यांविरोधात स्थानिक जनतेकडून वांरवार तक्रारी तथा नाराजी व्यक्त केली जात असली तरी प्रत्यक्षात या फेरीवाल्यांना स्थानिकांकडूनच संरक्षण दिले जात असल्याची माहिती समोर येत आहे. दादरमधील फेरीवाल्यांचे विक्रीचे साहित्य हे नजिकच्या इमारतींच्या आवारात तसेच दुकान आणि मार्केटच्या परिसरात ठेवण्यास मदत केली जात आहे. रात्रीच्या वेळी तसेच दिवसा महापालिका व पोलिसांच्या कारवाई दरम्यान या फेरीवाल्यांचे साहित्या जवळच्या इमारतींच्या आवारात नेऊन ठेवले जाते. परंतु याला इमारतींच्या सोसायटीकडून किंवा रहिवाशांकडून कोणत्याही प्रकारचा विरोध होत नाही. परिणामी महापालिकेच्या कारवाईनंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच पुन्हा फेरीवाले रस्त्यावर येत व्यवसाय करताना दिसत आहेत. (Dadar Hawkers)
रोहिंग्या मुस्लिम फेरीवाल्यांची संख्या मोठ्याप्रमाणात
मुंबईतील फेरीवाल्यांचा विषय दिवसेंदिवस जटील होत असला असून यातील दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या आसपासच्या परिसरात मोठ्याप्रमाणात फेरीवाल्यांची संख्या वाढत चालली आहे. दादर पश्चिम येथील परिसरात रोहिंग्या मुस्लिम फेरीवाल्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे, त्यामुळे याविरोधात भाजपचे माहिम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर आणि भाजप सचिव जितेंद्र राऊत यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थित आंदोलन केले होते. त्यामुळे दादरमधील फेरीवाल्यांमधील वाढत्या रोहिंग्यो मुसलमानांवरुन एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले. भाजपने याविरोधात केलेल्या आंदोलनानंतर काही प्रमाणात फेरीवाल्यांच्या संख्येवर नियंत्रण आले असले तरी पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणात फेरीवाल्यांचे प्रमाण वाढू लागले असून या वाढत्या फेरीवाल्यांविरोधातच स्थानिक रहिवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (Dadar Hawkers)
(हेही वाचा – Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला का केले आपलेसे? वाचा सविस्तर…)
दादरमध्ये महापालिकेसह पोलिसांच्यावतीने कारवाई केली जात असली तरी प्रत्यक्षात हे फेरीवाले आपले सर्व सामान आसपासच्या परिसरातील इमारतींच्या आवारात ठेवत असल्याचे दिसून येत आहे. रानडे मार्गावरील लक्ष्मी नारायण इमारतीच्या आवारात आसपासचे फेरीवाले आपले साहित्य ठेवत असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय दादर केशवसूत पुलाखालील फुल विक्रेते हे मिरांडा चाळीतील मागील बाजुस आपले साहित्य ठेवतात. तर रानडे मार्गावरील स्थानकासमोरील सर्व इमारतींच्या आवारात फेरीवाले आपले साहित्य ठेवत असून याशिवाय वीर सावरकर मंडई आणि किर्तीकर मार्केटसह अन्य जागेतही फेरीवाले आपले साहित्य ठेवत असल्याचे दिसून येत आहे. मात्र याठिकाणी रात्रीच्या वेळी साहित्य ठेवतानाच पोलिस व महापालिकेच्या कारवाई दरम्यानही हे साहित्य याच जागेत नेऊन ठेवले जाते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांसह गाळेधारक आणि दुकानदारांनी याला विरोध केल्यास दादरमध्ये एकही फेरीवाला व्यवसाय करू शकणार नाही, असे काहींचे म्हणणे आहे. (Dadar Hawkers)
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community