मुंबई महापालिका प्रशासन हे नियमित कर भरणाऱ्यांच्या पाठिमागेच अधिक लागते आणि बेकायदा राहणाऱ्या तथा व्यवसाय करणाऱ्यांना मात्र पूर्णपणे अभय देते हा अनुभव आता सर्वांनाच यायला लागला आहे. दादर भागातील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे (Dadar Hawkers) रेल्वे प्रवाशांसह स्थानिक जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता आणि पदपथ अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर (Dadar Hawkers) कारवाई करण्याची हिंमत न दाखवणारे महापालिका प्रशासन आता दादरमधील दुकानांच्या बाहेर ठेवलेल्या टेबल्ससह इतर वस्तू जप्त करु लागली आहे. ज्याचा त्रास जनतेला होतो, त्यांना अभय द्यायचे आणि महापलिकेला कर भरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करून महापालिका अधिकारी चिरीमिरीच्या नावाखाली खाल्या मिठाला जागत आहेत का असा सवाल दुकानदारांकडून केला जात आहे. (Dadar Hawkers)
दादरमधील फेरीवाल्यांची (Dadar Hawkers) समस्या दिवसेंदिवस वाढत जात असून या वाढत्या फेरीवाल्यांवर नियंत्रण मिळवण्यात महापालिका व पोलिस प्रशासनाला पुरते अपयश येत आहे. मागील शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व परवाना विभागाच्यावतीने सुरु असलेल्या कारवाईमध्ये रानडे मार्ग आणि छबीलदास गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या आकाश स्वीट्स अँड स्नॅक्सचे टेबल उचलण्यात आले. हे अधिकृत परवानाधारक दुकान असताना त्यांनी बाहेर ठेवलेल्या टेबलची अडचण महापालिकेला झाली, परंतु याच पदपथावर बॅग्स आणि वस्तूंची दुकाने पदपथ आणि रस्ते अडवून लावली जातात, त्याची महापालिकेला अडचण होत नाही. (Dadar Hawkers)
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई करण्यास येण्यापूर्वी फेरीवाल्यांना (Dadar Hawkers) आकाश स्वीट्सवर कारवाई आहे, त्यामुळे फेरीचे धंदे बंद ठेवावे अशाप्रकारच्या सूचना आधी फेरीवाल्यांना केल्या. त्यामुळे फेरीवाल्यांनी आधीच आपले व्यवसाय बंद ठेवले आणि मोकळ्या झालेल्या पदपथावर आकाश स्वीट्सचे टेबल दिसून आल्याने ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. मात्र, याचा दुकानदारांकडून तीव्र निषेध केला जात आहे. एकही पैसा महापालिकेला कर रुपात न भरणाऱ्या फेरीवाल्यांची अधिकारी काळजी घेत आहेत, पण दुकानदारांनी एक वस्तू बाहेर ठेवली तर कारवाई केली जाते. (Dadar Hawkers)
(हेही वाचा – IPL 2024 : वेस्ट इंडिजचा शेमार जोसेफ लखनौ सुपरजायंट्सच्या ताफ्यात दाखल)
दुकानांच्या बाहेर आपल्या वस्तूंचे प्रदर्शन का करू नये?
येथील एका दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, आम्ही काही त्यांचे हात ओले करत नाही, त्यांचे पोट हे फेरीवाल्यांच्या पैशावर चालते, त्यामुळे ते फेरीवाल्यांना अधिक संरक्षण देतात. जर मुंबईतील पदपथ आणि रस्ता मोकळा ठेवायचे असेल तर फेरीवाल्यांवर प्रथम कारवाई करावी मग आम्हीही दुकानांच्या बाहेर काहीही वस्तू ठेवणार नाही किंवा प्रदर्शित करणार नाही. पण फेरीवाल्यांनी पदपथ आपल्या वस्तूंचे प्रदर्शन करण्यासाठी अडवून ठेवायच्या, त्यामुळे लोकांना चालण्यास जागाही मिळत नाही, मग आम्ही तर दुकानांच्या बाहेर आपल्या वस्तूंचे प्रदर्शन का करू नये असा सवाल त्यांनी केला. (Dadar Hawkers)
प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई आमच्यावर प्रथम होते, का तर आम्ही परवानाधारक आहोत म्हणून! पण पातळ पिशव्यांचा सर्रास वापर हा फेरीवाल्यांकडून होतो, त्या केशव सूत उड्डाणपुलाखाली भाजी विकणाऱ्यांकडून भाज्या व वस्तू या पातळ पिशव्यांमध्ये बांधून विकल्या जातात. पण त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, कारण ते अनधिकृत आहेत म्हणून! मग अनधिकृत फेरीवाले (Dadar Hawkers) बसू नये याची काळजी महापालिकेने घ्यायची नाही तर कुणी घ्यायची? हा प्रकार म्हणजे चोर सोडून सन्याशाला शिक्षा असाच आहे, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. (Dadar Hawkers)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community