- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांसह २० ठिकाणांवरील फेरीवाल्यांवरील कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसार पुन्हा एकदा कडक केली जाणार असल्याचे महापालिकेने जाहीर केल्यानंतर अगदी तिसऱ्याच दिवशी या कारवाईचा फियास्को झाला. दादर पश्चिम रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरात ही कारवाई अपेक्षित मानली जात असली तरी प्रत्यक्षात सकाळपासून घाबरुन व्यवसाय करत नव्हते, परंतु दुपारपासून फेरीवाल्यांनी चोरीछुपे व्यवसाय करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने आपले बाकडे लावून व्यवसाय करण्यास सुरुवात केली. त्यामुळे महापालिका आणि पोलिस प्रशासन हे न्यायालयासोबतच जनतेचीही कारवाईच्या माध्यमातून फसवणूक करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. (Dadar Hawkers)
फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन न्यायालयाने महापालिका प्रशासन आणि पोलिसांचे कान उपटल्यानंतर गुरुवारी संध्याकाळपासून रेल्वे स्थानकांसह २० ठिकाणांवरील फेरीवाल्यांवर कारवाई कडक हाती घेतली. त्यामुळे यापूर्वीपासून हाती घेतलेल्या या २० ठिकणांवर पुन्हा फेरीवाल्यांना बसू देणार नाही असा निर्धार दोन्ही प्रशासनाने केल्याने पोलिस आणि महापालिकेच्यावतीने संयुक्त कारवाई केली जात होती. (Dadar Hawkers)
दादर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच भाजीच्या जुड्या विकण्यास सुरुवात
परंतु शनिवारी महापालिका कार्यालय बंद असले तरी परवाना विभाग आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी कार्यरत असतात. त्यामुळे दादर पश्चिम येथील केशवसूत उड्डाणपुलाजवळ स्थानकाशेजारी माल पकडणारी गाडी उभी करून कर्मचारी निघून गेले. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच तीन ते चार महिलांनी दोन गोण्या कोथिंबीर आणि मेथीची भाजीच्या जुड्या विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्थानकाच्या पायऱ्यावरच आणि केशवसूत उड्डाणपुलाखालीच या गाडीशेजारी या महिला व मुली पालेभाजीच्या जुड्या विकत असताना त्यांच्याकडील भाजी काढून घेण्याची हिंमत दाखवली जात नव्हती. (Dadar Hawkers)
(हेही वाचा – मनुस्मृती म्हणते बलात्काऱ्यांना सोडा; Rahul Gandhi यांच्याकडून मनुस्मृतीचा अवमान )
महापालिका आणि पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष
स्थानकाशेजारी भाजीची विक्री केली जात असल्याने मग दीडशे मीटर परिसरातील फेरीवाल्यांनी प्रथम थोडा थोडा माल विक्रीस ठेवून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर महापालिकेकडून कारवाई होत नाही हे लक्षात आल्यानंतर पुन्हा आपले तिथे व्यावसाय करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिसऱ्याच दिवशी तिथे फेरीवाल्यांवरील कारवाईकडे महापालिका आणि पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे. (Dadar Hawkers)
(हेही वाचा – Bengal मध्ये बनणार अयोध्येसारखे भव्य राममंदिर; २२ जानेवारीला पायाभरणीला सुरुवात, भाजपाने केली घोषणा)
फेरीवाले बसू नये याची जबाबदारी पोलिसांनी
केशवसूत उड्डाणपूलाखाली शिवाजी पार्क पोलिसांची बिट चौकी असून या बिट चौकीला खेटूनच फेरीवाले व्यवसाय करत असताना त्यांच्यावर पोलिसांकडूनही कोणतीही कारवाई करत नसल्याने महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेने एकदा फेरीवाल्यांवर कारवाई करून परिसरा फेरीवालामुक्त करून दिल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा फेरीवाले बसू नये याची जबाबदारी पोलिसांनी असताना पोलिस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत, त्यामुळे फेरीवालामुक्त परिसराची मोहिम फत्ते होत नाही असा सूर आळवायला सुरु केला आहे. (Dadar Hawkers)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community