स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान मिळायला भाग्य लागते, असे म्हणतात. दादरच्या हिंदू कॉलनीतील Dadar hindu colony ताराबाई मोडक शाळा मात्र ऐन विद्यार्थीदशेतच मुलांना ध्वजारोहणाचा मान देते. दहावी इयत्तेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला हा मान देऊन त्याच्या भविष्यातील वाटचालीस बळ देण्याचा हेतू यामागे आहे. यंदा हा बहुमान वेदांग प्रविण पाटील याने पटकावला.
दादरच्या हिंदू कॉलनीतीलDadar hindu colony शिशु बिहार मंडळ संचलित, पद्मभूषण ताराबाई मोडक शिक्षण केंद्रात ७७व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी शाळेच्या परंपरेनुसार ताराबाई मोडक सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कुलमधून एसएससी शालान्त परीक्षेत ९३ टक्के गुणांसह प्रथम आलेल्या वेदांग प्रविण पाटील याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आपल्या भाषणात उत्सवमूर्ती वेदांग पाटील याने स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन करून आपल्या शाळेच्या झेंडा अभिमानाने दरवर्षी असाच फडकत राहो, तसेच १० वी च्या निकालाचा आलेख चढता राहो, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
हा कार्यक्रम संस्थेच्या अधिक्षिका वृंदा रेडकर, ताराबाई मोडक सेकंडरी इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका दीपा सावंत-खोत, ताराबाई मोडक अध्यापक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय गायकवाड, शिशुविहार माध्यमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सुचित्रा कावळे, अभिनव प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा सुर्वे, ताराबाई मोडक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कुलच्या प्रभारी अपर्णा केसरकर, शिशु विहार प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका सारिका पुरंदरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्ग व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
Join Our WhatsApp Community