दादरमधील होलसेल फुलांची विक्री केल्या जाणाऱ्या स्वर्गीय मिनाताई ठाकरे मंडईचा पुनर्विकास केला जाणार असून या मंडईचा पुनर्विकासाचा आराखडा सध्या तयार केला जात आहे. सध्या तळ मजल्याच्या स्वरुपात असलेल्या या मंडईच्या पुनर्विकासात फुल विक्रेत्यासह अन्य वस्तू विक्रीची सुविधा करण्यात येणार आहे. (Meenatai Thackeray Market)
मुंबईतील दादर मिनाताई मंडई (Meenatai Thackeray Market) ही पूर्णपणे फुल विक्रेत्यांची असून दोन वर्षांपूर्वी येथील मासळी विक्रेत्या महिलांना हटवून तेथील बांधकाम तोडण्यात आले होते. त्यामुळे पारंपारिक मासळी विक्री करणाऱ्या महिलांवर अन्याय केला जात असल्याने या विरोधात प्रचंड रान उठले होते. दरम्यान, या मिनाताई ठाकरे फुल मार्केटचा (Meenatai Thackeray Market) पुनर्विकास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या मार्केटच्या पुनर्विकासात तीन ते चार मजल्यांचे बांधकाम केले जाण्याची शक्यता असून त्याठिकाणी फुल विक्रेत्यांसाठी स्वतंत्र मजला तसेच अन्य वस्तूच्या विक्रीसाठी यामध्ये गाळे उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या मंडईच्या पुनर्विकासाचा आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. (Meenatai Thackeray Market)
या तीन मंडईच्या पुनर्विकासाचे काम सुरु
सध महात्मा ज्योतीबा फुले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्विकासाचे काम ४०टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. तर शिरोडकर मंडईचे काम सुरु आहे. याचेही काम ४० टक्क्यांच्या आसपास पूर्ण झाले आहे. बाबू गेनू मंडईचे काम अद्यापही सुरु असून लवकरच ही सर्व कामे पूर्ण होतील असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. (Meenatai Thackeray Market)
मंडईचे जुन्या वास्तू तोडून पर्यायी व्यवस्था
चेंबूर भाऊराव चेंबूरकर मंडईच्या जुन्या इमारतीचे बांधकाम तोडण्यात आले आहे, तसेच गाळेधारकांची पर्यायी व्यवस्था म्हणून शेड बांधून देण्यात आली आहे. याबरोबरच महापालिकेच्या सी विभागातील आदमजी पिरजी मंडईच्या वास्तूचे बांधकाम तोडण्यात आले. त्याचे तसेच स्थलांतरीत करण्यासाठी पर्यायी शिबिराचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच खेरवाडी मंडईच्या वास्तूचे बांधकाम तोडून नव्याने बांधकाम करण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Meenatai Thackeray Market)
(हेही वाचा – Kuprej Garden : कुपरेज उद्यान उजळून निघणार)
या मंडईंचा होणार पुनर्विकास
- बोरीवली मंडई
- अंधेरी नवलकर मंडई
- चेंबूर लक्ष्मण बाबू मोरे मंडई
- मालाड सोमवार बाजार
- मिनाताई ठाकरे फुल मार्केट (Meenatai Thackeray Market)
दुरुस्ती सुरु असलेल्या मंडई
- मिर्झा गालिब मंडई
- ग्रँट रोड लोकमान्य टिळक मंडई
- फोर्ट मंडई
- जिजामाता मंडई
- जे बी शाह मंडई
- डोंगरी मंडई (Meenatai Thackeray Market)
या मंडईंची होणार दुरुस्ती
- कुर्ला लक्ष्मणराव यादव मंडई
- दादर क्रांतिसिह नाना पाटील मंडई
- दादर हॉकर्स प्लाझा मंडई
- माटुंगा लाल बहादूर शास्त्री मंडई
- गोवंडी केना मंडई अर्थात वामनराव कर्डक मंडई
- वरळी खरुडे मंडई
- कामाठी पुरा मंडई
- वांद्रे टाऊन मंडई (Meenatai Thackeray Market)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community