Hawkers : दादरमधील फेरीवाल्यांना हटवणे या जन्मात तरी शक्य नाही, फेरीवाल्यांमधूनच ऐकायला येते चर्चा

632
Hawkers : शीव येथील इंदिरा मार्केटला वाढतोय अनधिकृत स्टॉल्स आणि फेरीवाल्यांचा विळखा; भाजपाची तातडीने कारवाईची मागणी

दादर रेल्वे स्थानकाजवळील (Dadar Railway Station) फेरीवाल्यांना हटवण्याची मोहिम महापालिकेने पोलिसांसह संयुक्तपणे हाती घेतली असली तरी प्रत्यक्षात यात यश येताना दिसत नाही. सुट्टीच्या दिवशी तसेच महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) कार्यालयीन वेळेनंतर फेरीवाले रेल्वे स्थानक परिसरात ठाम मांडून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेने दादर पश्चिम रेल्वे स्थानकांच्या दीडशे मीटर परिसरातील फेरीवाले हटवण्याची मोहिम तीव्र केली असली तरी प्रत्यक्षात याठिकाणी फेरीवाले दिसून येत असल्याने कुणी कितीही वल्गना करो, या जन्मात तरी त्यांना दादर रेल्वे स्थानक (Dadar Railway Station) परिसर फेरीवाला मुक्त करता येणार नाही अशा चर्चा फेरीवाल्यांमधूनच ऐकायला मिळत आहे. (Hawkers)

( हेही वाचा : Maternity Hospital : पूर्व उपनगरांतील प्रसुतीगृहांमध्ये पर्यायी विजेसाठी जनरेटर युपीएसची यंत्रणा

रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसर फेरीवालामुक्त करण्याच्यादृष्टीकोनातून महापालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाने निर्देश जारी केले आहे. तत्पूर्वी मुंबईतील २० ठिकाणेही फेरीवालेमुक्त करण्यासाठीचीही मोहिमहही हाती घेण्यात आली. त्यामुळे पहिल्या मोहिमेमध्ये दादर पश्चिम रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसराचा समावेश होता. त्यामुळे दोन्ही मोहिमांमध्ये दादर रेल्वे स्थानकाच्या १५०मीटर परिसराचा समावेश असूनही महापालिकेच्या कार्यालयीन वेळेनंतर तसेच सुट्टीच्या दिवशी रेल्वे स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा पडलेला पहायला मिळत आहे. (Hawkers)

दादर रेल्वे स्थानकापासून (Dadar Railway Station) दीडशे मीटर परिसरात शनिवारी तसेच रविवारीही मोठ्याप्रमाणात फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याचे दिसून येत आहे. याभागातील फेरीवाल्यांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेची कारवाई ही केवळ चार दिवसांची असते. त्यांची पाठ फिरली की आम्ही धंदा थाटायला मोकळे होतो. तसे पाहिले तरी दादरमध्ये अशाप्रकारे किती वेळा मोहिम हाती घेतली, पण ती तर काही दिवसच चालते. कुणीही येथील फेरीवाल्यांना कायमचे हटवू शकत नाही. या जन्मात तरी महापालिकेला फेरीवाल्यांना कायमचे हटवणे शक्य नाही,अशी कुजबूज फेरीवाल्यांमध्ये ऐकायला मिळत आहे. (Hawkers)

फेरीवाल्यांच्या खासगीतील चर्चेनुसार, महापालिकेचे (Mumbai Municipal Corporation) अधिकारी आपले काम करता आणि आम्ही आमचे काम करतो. त्यांना कारवाई करायची आहे आणि आम्हाला व्यवसाय करायचा आहे. त्यामुळे पूर्णपणे फेरीवाल्यांना ते बंदी करूच नाही आणि तेवढी मॅनपॉवरही त्यांच्याकडे नाही. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही कारवाई करायची इच्छा नसते, परंतु अधिकाऱ्यांच्या दबावामुळे महापालिकच्या अधिकाऱ्यांना ही कारवाई करावी लागते. पण आजवर अनेकदा प्रयत्न करूनही जर कारवाई गुंडाळण्याची वेळ आली होती तर आताही काही दिवस चालेल आणि मग बंद पडेल असाही विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. (Hawkers)

दरम्यान, महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरात फेरीवाल्यांवरील कारवाई तीव्र केल्यानंतर आता आजवर तोंड न उघडणाऱ्या उबाठा शिवसेनेच्या माजी नगरसेविक प्रीती पाटणकर यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासकांना निवेदन देत दादर भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या पक्षाचे आमदार महेश सावंत (Mahesh Sawant) आणि स्थानिक माजी नगरसेविका प्रिती पाटणकर (Preeti Patankar) यांनीही मागणी केल्यानंतरही तरी दादर रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई होणार का असाही सवाल उपस्थित होत आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.