धक्कादायक! दादरमध्ये दोन गाड्या एकाच ट्रॅकवर, मध्य रेल्वे विस्कळीत

195
दादर-माटूंगा रेल्वे स्थानकादरम्यान दोन लांब पल्ल्याच्या गाड्या एकाच ट्रॅकवर आल्याची घटना घडली. गदग एक्स्प्रेस आणि पदुचरी एक्स्प्रेस या गाड्या शुक्रवारी, १५ एप्रिल रोजी, रात्री ९. ४५ वाजताच्या सुमारास एकाच ट्रॅकवर आल्या.  सिंग्नल यंत्रणेमुळे हा गोंधळ झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर मात्र प्रवाशी घाबरून गाडीमधून खाली उतरू लागले. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर मेगाब्लॉक; परशुराम घाट रोज ५ तास राहणार बंद )

रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक! पहा वेळापत्रक…

याआधीही मुंबईत अशी घटना घडली होती. शुक्रवारी रात्री गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडून या घटनेबाबत कोणतीही माहिती सध्या देण्यात आलेली नाही. एक्सप्रेसमधील प्रवासी ट्रॅकवर उतरल्याने लोकल वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. मुंबईहून कल्याणकडे जाणारा फास्ट ट्रॅक ठप्प झाला आहे. पटरीवरून डबे घसरल्याने समोरून येणारी ट्रेन समोर आली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.