दादर टी.टी. पुलाखालील भागाचे सुशोभीकरण

आता दादर, नायगावकरांसह पर्यटकांनाही या पुलाखालील भागात मनसोक्त फेरफटका मारता येईल.

94

दादर टी.टी.जवळील नाना शंकर शेठ उड्डाणपुलाखालील भागाचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून, मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या पुलाखालील भागाचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पाडले. स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांच्या प्रयत्नातून करण्यात आलेल्या या पुलाखालील सुशोभित भागाचे लोकार्पण करण्यात आल्याने आता दादर, नायगावकरांसह पर्यटकांनाही या पुलाखालील भागात मनसोक्त फेरफटका मारता येईल.

IMG 20210612 WA0148

आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण

दादर टी.टी. जवळील नाना शंकरशेठ उड्डाणपुलाखाली साठ हजार स्क्वेअरफुट मध्ये तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण जेष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उद्यान, तसेच कालनिर्णयकार जयंत साळगावकर उद्यानाचे तसेच सहकार नगरच्या मनोरंजन केंद्रातील अभ्यासिका, योगा केंद्र, जिमचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते १२ जून २०२१ रोजी पार पडले. यानंतर  ठाकरे यांनी संपूर्ण उद्यानाचा फेरफटका मारला.

IMG 20210612 WA0149

मान्यवर उपस्थित

स्थानिक नगरसेवक अमेय घोले तसेच स्थानिक नगरसेविका उर्मिला पांचाळ यांच्या पुढाकाराने विकसित करण्यात आलेल्या या उद्यानाच्या लोकार्पण समारंभाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार मनीषा कायंदे, माजी महापौर तथा नगरसेविका श्रद्धा जाधव, नगरसेवक समाधान सरवणकर, उपायुक्त (परिमंडळ -२) विजय बालमवार, एफ/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

IMG 20210612 WA0147

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.