दादर पश्चिम येथील गोल हनुमान मंदिरासमोरील मलवाहिनीतील मल बाहेर वाहून दुर्गंधी पसरत असल्याचे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ने प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्याठिकाणी मलनि:सारण वाहिनीतील मल शोषून घेणाऱ्या वाहनाद्वारे या वाहिनीतील साचलेला मल तातडीने साफ करण्यात आला. मात्र, यातील मल पुन्हा बाहेर वाहून जाऊ नये याकरता कायमस्वरुपी तोडगा निघत नाही तोवर दिवसातील तिन्ही पाळ्यांमध्ये या मलवाहिनीची सफाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार या मलवाहिनीतील मॅनहोल्सची सफाई दिवसांतून तीन वेळा करण्यात येत आहे. (Dadar)
‘दादरच्या गोल देऊळासमोरच वाहते मलमिश्रित पाणी’ या मथळ्याखाली ‘हिंदुस्थान पोस्ट’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले होते. दादर पश्चिम येथील गोल देऊळा समोरील भागातच मागील अनेक दिवसांपासून मलनि:सारण वाहिनीतील मल मिश्रित पाणी रस्त्यावर वाहत असतानाही याकडे लक्ष दिले जात नव्हते. याबाबतचे अशा प्रकारचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी मलनि:सारण प्रचालन विभागाला निर्देश देत तातडीने मलनि:सारण वाहिनीतील गाळ साफ करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी ७ वाजता याठिकाणी मल शोषून घेणारे वाहनासह (संक्शन व्हेहीकल) कर्मचारी तिथे पोहोचले आणि त्यांनी तुंबलेली मलवाहिनी साफ केली. त्यामुळे वाहणाऱ्या मलमिश्रित पाण्याचा प्रवाह थांबला गेला आहे. (Dadar)
(हेही वाचा – Dadar च्या गोल देवळासमोरच वाहते मलमिश्रित पाणी)
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रहिवाशांच्या इमारतीच्या मलवाहिनी जिथे मॅनहोल्समध्ये जोडल्या गेलेल्या आहेत, त्यातील काही वाहिनी खराब झालेल्या आहेत, त्यामुळे या वाहिनी बंद आहे. त्यामुळे मुख्य वाहिनीतून मल वाहून न जाता तो मॅनहोल्स भरल्यानंतर तो बाहेर वाहू लागतो. (Dadar)
महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त सतिश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या मलवाहिनीच्या मॅनहोल्सची तातडीने सफाई केली होती. परंतु सोसायट्यांच्या मलवाहिनी जिथे जोडल्या जातात, त्या खराब झालेल्या आहेत. त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असून अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली आहे. या मॅनहोल्सच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार असून वाहतूक पोलिसांची परवानगी मिळताच याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. मात्र, हे दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत या मॅनहोल्सची दिवसांतून तीन वेळा सफाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्यानुसार, याची दिवसांतून तीन वेळा सफाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Dadar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community