भारतीय रेल्वेमार्गांवरील अनेक ठिकाणी विद्युतीकरणाचे काम केले असून, देशातील सर्वात मोठे रेल्वेचे विद्युतीकरण कोकण मार्गावर केले आहे. चाकरमान्यांच्या हक्काची असलेली कोकण रेल्वे आता पूर्णपणे विजेवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे.
15 सप्टेंबर गुरुवारपासून कोकणात जाणा-या दादर ते सावंतवाडी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस आणि दिवा- सावंतवाडी एक्सप्रेस पूर्णपणे विद्युत इंजिनावर चालवण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणा-या 970 किमी लांबीच्या रुळांवर विद्युतीकरण मार्च 2022 मध्ये पूर्ण झाले आहे.
कधी लागणार विद्युत इंजिन?
आता टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्या विद्युत इंजिनावर चालवण्याचे नियोजन कोकण रेल्वेने केले आहे. त्यानुसार, 15 सप्टेंबर रोजी दादर ते सावंतवाडी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, 20 सप्टेंबर रोजी मांडवी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस, दिवा- सावंतवाडी एक्सप्रेस, 15 ऑक्टोबर रोजी जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, 1 जानेवारी 2023 रोजी मुंबई- मेंगलोर एक्सप्रेस या गाड्यांना विद्युत इंजिन लागणार आहे.
( हेही वाचा: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! परीक्षेविना केली जाणार निवड; येथे करा अर्ज )
- मुंबई- कोकण मार्गावर अप-डाऊन एकूण गाड्या 20
- देशातून एकूण 37 रेल्वेगाड्यांची वाहतूक
- रेल्वेच्या विद्युतीकरणाला 2016 रोजी रेल्वे मंत्रालयाची मंजूरी
- रत्नागिती ते थिविम या दरम्यान विद्युतीकरण
- 970 किमी लांबीच्या रुळांवर विद्युतीकरण
- विद्युतीकरणासाठी एकूण 1287 कोटी रुपयांचा खर्च