डहाणूचे तापमान राज्यात सर्वात जास्त

राज्यात पावसाच्या गैरहजेरीत कोकणपट्ट्यात गेल्या दहा वर्षांतील सरासरीच्या तुलनेत कमाल तापमान एका अंशाने नोंदवले जात आहे. परिणामी मुंबईनंतर डहाणूतील कमाल तापमान राज्यात सर्वात जास्त नोंदवले जात असल्याचे तापमान नोंदणीत आढळले. मंगळवारी डहाणूचे कमाल तापमान 31.8 अंश सेल्सियस नोंदवले गेले. हे तापमान राज्यात सर्वात जास्त होते. केवळ महाबळेश्वर येथे कमाल तापमान 19.1 अंश सेल्सीयसवर नोंदवले जात आहे.

कोकणातील वेधशाळेच्या स्थानकात कमाल तापमान

डहाणूच्या कमाल तापमानाची नोंदणी जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत 1.5 अंशाने जास्त होती. उर्वरित कोकणातील वेधशाळेच्या स्थानकात कमाल तापमान 30 ते 29 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. कोकणात किमान तापमान 25 ते 27 अंशादरम्यान नोंदवले जात आहे. किमान तापमानातही सरासरीत एक अंशाने वाढ दिसून आली आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कुठेही कमाल तापमानात वाढ झालेली नाही. या सर्व भागात कमाल तापमान 27 ते 29 अंशादरम्यान दिसून येत आहे. केवळ महाबळेश्वर येथे कमाल तापमान 19.1 तर किमान 17 अंशावर नोंदवले गेले. महाबळेश्वर मधील किमान तापमान मंगळवारी राज्यात सर्वात कमी तापमान होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here