बापरे! डहाणूत फटाका कंपनीतील स्फोटाचे धक्के भूकंपासारखे! 

या कंपनीतील स्फोटामुळे आजूबाजूच्या 5 ते 10 किलोमीटर अंतरावरील घरांना भूकंपासारखे मोठे धक्के जाणवले. 

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात शुक्रवार, १७ जून रोजी एका फटाका कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली. या स्फोटामुळे डहाणूत एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या.

5 ते 10 किलोमीटर अंतरावर भूकंपासारखे मोठे धक्के जाणवले!

डहाणू तालुक्यातील डेहणे येथील विशाल फटाका कंपनीला ही आग लागली. डहाणू महामार्गापासून 15 किमी अंतरावर जंगलामध्ये ही फाटकानिर्मिती करणारी कंपनी आहे. अचानक झालेल्या स्फोटामुळे आजूबाजूच्या 5 ते 10 किलोमीटर अंतरावरील घरांना भूकंपासारखे मोठे धक्के जाणवले. या कारखान्याचे पत्रे तसेच पार्क केलेल्या गाड्या 100 मीटर अंतरावर फेकल्या गेल्या.

अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही!

स्फोटानंतर भीषण आग लागली आहे. आगीमुळे धोराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे. नेमका हा स्फोट कशामुळे झाला आहे, याची माहिती अद्याप कळू शकली नाही. यावेळी 50 पेक्षा अधिक कामगार कारखान्यात काम करत असल्याची माहिती एका कामगाराने दिली. यामध्ये 10 जण जखमी तर 1 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर डहाणू येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. स्थानिक पोलिस प्रशासन आणि गावकरी घटनास्थळी दाखल असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या कंपनीत ज्या प्रकारे भीषण स्फोट झाला हे पाहता कंपनीत मोठ्या प्रमाणात दारुगोळा जमा झाला होता हे स्पष्ट होते. आता हा दारु साठा सुरक्षित ठेवण्यात आला होता का, त्यासाठी काय उपाययोजना करण्यात आली होती का, हा स्फोट कोणत्या कारणामुळे लागली, याची चौकशी करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here