माटुंगा येथील श्री वरदान गोविंदा पथकाने यंदाच्या वर्षीही दहीहंडी (Dahi Handi 2023) उत्सवात सहभागी होताना, हिंदुत्वाच्या विचारांचा प्रचार प्रसार केला. यासाठी पथकाने सर्व गोविंदांना टी शर्ट छापले, जे सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. कारण त्या टी शर्टवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो छापला होता, तसेच तयावे ‘हिंदू हिताचे राजकारण आणि हिंदूंचे सैनिकीकरण’ हे वाक्यही छापले होते.
हेही पहा –
श्री वरदान गोविंदा पथक दरवर्षी वीर सावरकर यांचे फोटो छापलेले टी शर्ट वितरित करत असते. यंदा दहीहंडी (Dahi Handi 2023) महोत्सवासाठी १५० टी शर्ट छापले. थर लावताना भारतमाता कि जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या जातात आणि सलामी देणारा गोविंदा ‘स्वातंत्र्यलक्ष्मीचा विजय असो’ अशी घोषणा देतो. या सगळ्या कार्यात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून मदत होत असते. आमच्या पथकामध्ये मुसलमान तरुणही आहेत, त्यांनीही आवडीने हे टी शर्ट घातले. परळपासून सांताक्रुझपर्यंत पथक फिरले. २५ ठिकाणी सलामी दिल्या. सहा थराचे आमचे पथक आहे. हिंदुत्वाचे विचार पसरवणे हा या मागील उद्देश आहे, असे श्री वरदान गोविंदा पथकाचे सल्लागार प्रशांत पळ यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ ला बोलताना सांगितले.
देशात नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री झाल्यापासून हिंदुत्वाचा आवाज घुमत आहे. वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. श्री वरदान गोविंदा पथकाने दहीहंडी (Dahi Handi 2023)च्या निमित्ताने वीर सावरकरांचा संदेश देण्यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे विखुरलेल्या हिंदूंनी आता तरी देशहितासाठी एकत्र यावे. श्री वरदान गोविंदा पथकाचे आयोजन नितीन येंडे, अशोक सावंत, अनिल राणे, स्वप्नील कांबळे, प्रवीण नाईक व सल्लागार, सावरकरप्रेमी प्रशांत पळ यांनी केले.
(हेही वाचा Thane Dahihandi : ठाणे शहरात १३ गोविंदा जखमी; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु)
Join Our WhatsApp Community