Dahi Handi उत्सवादरम्यान २३८ गोविंदा जखमी; जखमींमध्ये बालगोविंदांचाही समावेश

87
Dahi Handi उत्सवादरम्यान २३८ गोविंदा जखमी; जखमींमध्ये बालगोविंदांचाही समावेश
Dahi Handi उत्सवादरम्यान २३८ गोविंदा जखमी; जखमींमध्ये बालगोविंदांचाही समावेश

राज्यभरात दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दहीहंडीनिमित्त ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या उत्सवाला काही ठिकाणी गालबोट लागलंच. मुंबईत संपूर्ण दिवसभरात २३८ गोविंदा जखमी झाले. त्यापैकी 32 रुग्णालयात दाखल असुन 2 गोविंदांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत २०४ गोविंदाना रुग्णालयातुन घरी पाठवण्यात आलं आहे.

(हेही वाचा –Jai Jawan गोविंद पथकाचा १० थराचा प्रयत्न थोडक्यात हुकला)

दहीहंड्या (Dahi Handi) फोडताना जखमी झालेल्या गोविंदांना उपचारासाठी मुंबईतील केईएम, नायर, सायन, कूपर या मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्जेस आणि जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दही हंडी उत्सावाच्या पार्श्वभूमीवर सर्व रुग्णालयांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या.

(हेही वाचा –शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – CM Eknath Shinde)

दरवर्षी दहीहंडी (Dahi Handi) फोडताना मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात. या गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारबरोबरच महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांत जखमी गोविंदांची संख्या 200 वर पोहचली आहे. मुंबई आणि ठाण्यात जवळपास 1 हजार 354 दहीहंडी उत्सवांचं आयोजन करण्यात आलं होतं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.