दरवर्षी दहीहंडीच्या (Dahi Handi) वेळी अनेक अपघातांच्या घटना घडतात म्हणूनच दहीहंडी असोसिएशनच्या वतीने गोविंद पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत. सरावाप्रमाणेच थर लावा, बक्षिसांसाठी चुकीचे थर लावू नका अशा सूचनाच दहीहंडी असोसिएशनचे वतीने देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर्षी ‘शून्य अपघात गोविंदा’ मोहिमेचे थर लावण्यासाठी असोसिएशनचे प्रयत्नशील असल्याचे समोर आले आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक आणि खासगी अशा एक हजार ४०० दहीहंड्या उभारल्या जाणार आहेत. या हंड्यांमधील बक्षीसरूपी ‘लोणी चाखण्यासाठी दोन महिन्यांपासून लहान – मोठ्या गोविंदा पथकांचा जोरदार सराव सुरु आहे. मात्र अनेकदा स्पर्धेच्या नादात उत्सवादरम्यान अपघात होऊन गोविंदा जखमी होण्याच्या घटना दरवर्षी घडतात. त्यामुळे उत्सवाला गालबोट लागते. हे प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक गोविंदा पथकांनी त्यांच्या क्षमता ओळखूनच थर रचण्याचे आवाहन दहीहंडी असोशिएशनने केले आहे. सरावादरम्यान पथकांकडून उभारल्या जाणाऱ्या थरांप्रमाणे थर लावणे, पाच, सहा थरांची मर्यादा असल्यास तितकाच प्रयत्न करणे, कमी गोविंदांच्या साथीने सात धरांचा प्रयत्न टाळणे अशा सूचना पथकांना दिल्याची माहिती दहीहंडी असोशिएशनचे उपाध्यक्ष समीर पेंढारे यांनी दिली.
त्यामुळे उत्सवात गोविंदा जखमी होण्याच्या घटना टाळण्यास मदत होईल असा विश्वास पेंढारे यांनी व्यक्त केला.तसेच येणाऱ्या गोविंदा पथकांना या गर्दीच्या ठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांनाही बजाज अलायंझ कंपनीच्या सहकार्याने विमा उतरवण्यात येणार आहे. त्यांनाही विम्याचे संरक्षण मिळणार आहे. महोत्सव साजरा करीत असतानाही कोणत्याही प्रकारची स्पर्धा नसुन उत्सव आणि परंपरेला साजेल असा हा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.स्पर्धेतील बक्षिसांच्या नादात जीव धोक्यात घालून थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना यंदा महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community