Dahihandi 2024 : विक्रोळीत जय जवान पथकाचे ९ थर; एकावर एक ४ एक्के

मुंबईत जय जवान गोविंदा पथक हे अतिशय लोकप्रिय गोविंदा पथक असून या पथकाने विक्रोळीतील कार्यक्रमात नऊ थरांची सलामी दिली आहे.

257

दहीहंडी उत्सवानिमित्त (Dahihandi 2024) मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या असून या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांसारख्या मोठ्या हंड्या उभारण्यात आल्या आहेत. विक्रोळीत जय जवान पथकाने ९ थर लावून सलामी दिली. त्यासाठी एकावर एक ४ एक्के लावले. हे पथक यंदा विक्रमाच्या तयारीत आहे.

राज्यभरात दहीहंडीचा (Dahihandi 2024) उत्साह आहे. मुंबईत विविध ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाणे, विक्रोळी, जोगेश्वरी, दादर अशा विविध ठिकाणी गोविंदा पथकं दहीहंडीचे थर लावत सलामी देत आहेत. मुंबईत जय जवान गोविंदा पथक हे अतिशय लोकप्रिय गोविंदा पथक असून या पथकाने विक्रोळीतील कार्यक्रमात नऊ थरांची सलामी दिली आहे. यंदा जय जवान गोविंदा पथ दहा थरांची सलामी देणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या पथकाकडे अनेकांच्या नजरा आहेत.

(हेही वाचा Church : झारखंड, मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्‍यांतील चर्चच्‍या संख्‍येत दुपटीने झाली वाढ)

जय जवान गोविंदा पथकाची ९ थरांची सलामी

जय जवान गोविंदा पथकाने मागील अनेक वर्षांपासून आतापर्यंत अनेक बक्षिसं जिंकली आहेत. यंदाच्या दहीहंडी उत्सवात (Dahihandi 2024) जय जवान पथकाने सर्वात आधी विक्रोळीतील आयोजित कार्यक्रमात ९ थरांची सलामी दिली. त्यानंतर ते १० थर लावणार असल्याचं बोललं जात आहे. हे गोविंदा पथक मुंबईतील विविध ठिकाणी जात एकावर एक मानवी थर रचून सलामी देतात. शेवटच्या थराला या गोविंदा पथकाने चार एक्के लावत सलामी दिली.

जय जवान गोविंदा पथकाच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड!

जय जवान गोविंदा पथकाच्या गोविंदांनी ऑगस्ट 2022 मध्ये सर्वात उंच मानवी पिरॅमिडचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आणि मुंबईत 50 फूट उंचीवर दहीहंडी फोडली होती. ऑगस्ट 2012 मध्ये, जय जवान गोविंदा पथकाने ठाण्यात 13.34 मीटरचा मानवी पिरॅमिड तयार केला ज्यामध्ये नऊ थरांचा समावेश होता. स्पेन आणि चीनच्या संघांनी अनुक्रमे ऑक्टोबर 2012 आणि जुलै 2015 मध्ये भारताच्या गुणांची बरोबरी केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.