Dahihandi 2024 : गोविंदांना नो-टेन्शन; १ लाखाहून अधिक जणांचा विमा निघालाय

२००५ पासून दहीहंडी पथकांना विमा संरक्षण देणारी ओरिएंटल इन्शुरन्स ही एकमेव विमा कंपनी आहे.

83
गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त (Dahihandi 2024) १३०० हून अधिक दहीहंडी पथकांमधील एक लाखाहून अधिक गोविंदांचा विमा उतरविण्यात आला आहे. गेल्या वर्षी विमा घेतलेल्या गोविंदांची संख्या ८० हजाराच्या आसपास होती. मात्र, २६ ऑगस्टपर्यंत एक लाखाहून अधिक गोविंदांचा विमा काढण्यात आला. या विम्यांतर्गत प्रत्येक गोविंदाला ७५ रुपयांमध्ये १० लाख रुपयांचा विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. गेल्या वर्षी १२०० हून अधिक गोविंदा मंडळांनी स्वतंत्रपणे विमा काढला होता. यंदा त्यात १०० हून अधिक मंडळांची भर पडली आहे. विम्यासाठीचा प्रीमियम विचारात घेतल्यास राज्य सरकार आणि वसई विरार महानगरपालिकेने जवळपास ६५ लाख रुपयांचे योगदान दिले आहे.

विम्याचे प्रमाण वाढले 

२००५ पासून दहीहंडी पथकांना विमा संरक्षण देणारी ओरिएंटल इन्शुरन्स ही एकमेव विमा कंपनी आहे. दहीहंडी (Dahihandi 2024) दरम्यान विमा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र सरकारने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सचे मुख्य तांत्रिक अधिकारी टी. ए. रामलिंगम यांच्या मते, उत्सव विम्यासाठी गोळा केलेले प्रीमियम तीनपटीने वाढले आहेत. ही रक्कम पाच वर्षांपूर्वी २० लाख इतकी होती. २०२४ वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत हाच आकडा ७० लाखांवर गेला आहे. त्यात विम्याची रक्कम अंदाजे २०० टक्क्यांनी वाढली आहे. सहभागी लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केल्याने विमा पॉलिसीचे प्रमाण वाढल्याचे बोलले जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.