मुंबई महापालिकेच्या प्रशासनात अत्यंत हुशार अभियंते असतानाही महापालिका प्रशासन हे सल्लागारांवरच अवलंबून आहे. मात्र, महापालिका प्रशासनाचे एक किंवा दोन सल्लागारांची नेमणूक करून समाधान होत नाही तर दहिसर पश्चिम येथील स्कायवॉकच्या दुरुस्तीच्या कामांसाठीच तब्बल तीन सल्लागारांची मदत घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, तीन सल्लागारांची मदत घेतल्यानंतरही दहिसर स्कायवॉकच्या जिन्यासह काही भाग तोडून नव्याने पुनर्बांधणी करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली असली तरी प्रत्यक्षात या कामांमध्ये केवळ डागडुजी करण्यावरच भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. (Dahisar Skywalk Reconstruction)
दहिसर पश्चिम येथील लोकमान्य टिकळ मार्गावरील स्थानकाच्या लगतचे एमएमआरडीएने बांधलेले स्कायवॉक महापालिकेच्या ताब्यात २०१५मध्ये आल्यांनतर सन २०१६मध्ये याचा काही भाग कोसळला. त्यामुळे महापालिकेने या स्कायवॉकची संरचनात्मक तपासणी करण्यासाठी व्हीजेटीआयचे प्राध्यापक डॉ अभय बांबोळे यांची नेमणूक केली होत. बांबोळे यांनी आपल्या अहवालामध्ये स्कायवॉकच्या जीर्ण स्लॅब तोडून मुख्य संरचनात्मक दुरुस्ती करण्याचे सुचविले होते. परंतु त्यानंतर महापालिकेने पुन्हा या स्कायवॉकची तपासणी करण्यासाठी एस सी जी कन्सल्टन्सी सर्विसेस या सल्लागाराची नेमणूक केली, या सल्लागाराने ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी लेखापरिक्षण अहवाल केला. त्यांच्या अहवालानुसार स्कायवॉकच्या ८ पैकी ७ जीन्यांसह आकाशमार्गिकेचा अर्थात स्कायवॉक डेक स्लॅब धोकादायक अवस्थेत असल्याने ते बांधकाम पाडून त्याची पुनर्बाधणी करण्याची सल्लागाराने शिफारस केली. (Dahisar Skywalk Reconstruction)
(हेही वाचा – Ravli Hill : रावळी टेकडीवरील महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता अधिक मजबूत)
…तरीही कंत्राटदाराकडून योग्यप्रकारे केले जात नाही काम
त्यानुसार महापालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाचा आराखडा, नियोजन, संकल्पचित्रे, अंदाजपत्रक व मसुदा निविदा बनवण्यासाठी फेमस्ट्रक्ट कन्सल्टींग इंजिनिअरींग एलएलपी यांची तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली. त्यानुसार निविदा मागवून पात्र कंपनीची निवड करण्यात आली. या कामासाठी स्वस्तिक कस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आला. यामध्ये कंपनीने तब्बल उणे ३३ टक्के कमी दराने निविदा भरुन हे काम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापालिकेच्या २७.८७ कोटी रुपयांच्या तुलनेत कंत्राटदाराने १८.६४ कोटी रुपयांमध्ये हे काम करण्यासाठी बोली लावली आहे. त्यामुळे विविध करांसह एकूण २३. ९८ कोटी रुपये यावर खर्च केले जाणार आहेत. (Dahisar Skywalk Reconstruction)
पण प्रत्यक्षात जिन्यासह हे काम तोडून नवीन बांधणे अपेक्षित असताना अद्यापही कंत्राटदाराने हे जिने तोडलेले नाही की त्यांच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. त्यामुळे फेमस्ट्रक्ट कन्सल्टींग इंजिनिअरींग एलएलपी या सल्लागार कंपनीला ५२ लाख ५६ हजार रुपये एवढी रक्कम अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे सल्लागारांवर तब्बल पाऊण ते एक कोटींच्या आसपास खर्च केल्यानंतरही कंत्राटदाराकडून याचे काम योग्यप्रकारे केले जात नाही. त्यामुळे सल्लागारांच्या अहवालानुसार कामे करूनही प्रशासन योग्यप्रकारे होत नसल्याने मग हे सल्लागार सल्ला काय देतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामे काय होता असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. (Dahisar Skywalk Reconstruction)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community