दहिसर ते मीरा-भाईंदर Metro Line – 9 च्या डेपो मार्गात होणार बदल ?; एमएमआरडीएचा मोठ्या आर्थिक बचतीचा दावा

69
दहिसर ते मीरा-भाईंदर Metro Line - 9 च्या डेपो मार्गात होणार बदल ?; एमएमआरडीएचा मोठ्या आर्थिक बचतीचा दावा
दहिसर ते मीरा-भाईंदर Metro Line - 9 च्या डेपो मार्गात होणार बदल ?; एमएमआरडीएचा मोठ्या आर्थिक बचतीचा दावा

दहिसर (Dahisar) ते मीरा-भाईंदर (Mira-Bhainder) मेट्रो ९ (Metro Line – 9) मार्गिकेच्या सुभाषचंद्र बोस स्थानकापासून उत्तनपर्यंतच्या मार्गात बदल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हालचाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केल्या आहेत. यापूर्वीच्या नियोजनानुसार सुभाषचंद्र बोस ते उत्तनदरम्यान नव्याने दोन स्थानके उभारण्यात येणार होती. या दोन स्थानकांसाठी सुमारे १६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र नव्या नियोजनानुसार ही मेट्रो मार्गिका पाणथळ आणि मिठागराच्या जमिनीवरून नेली जाणार आहे.

(हेही वाचा – भारतीय युद्धनौका INS Tushil सेनेगल भारतात दाखल)

राई-मुर्धे आणि मोरवा गावातून ही मार्गिका घेऊन जाण्याऐवजी सुभाषचंद्र स्थानकापासून मिठागरांच्या जमिनीवरून उत्तनपर्यंत नेण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे ६०० कोटी रुपयांची बचत होईल, असा दावा करण्यात येत आहे. यापूर्वी या मेट्रो मार्गिकेचे शेवटचे स्थानक मीरा-भाईंदर येथील सुभाषचंद्र बोस स्टेडियम (Subhash Chandra Bose Stadium) होते, तर राई-मुर्धे येथे कारशेड उभारले जाणार होते. मात्र त्याला स्थानिकांचा विरोध होता. त्यामुळे उत्तनला डोंगरी येथे कारशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने एमएमआरडीएला जागा दिली आहे, तर एमएमआरडीएने खासगी मालकीच्या २.४ हेक्टर जागेची अधिग्रहण प्रक्रिया सुरू केली आहे.

मिठागरांच्या जमिनीवरून उत्तन लोकवस्ती अधिक नसल्याने मेट्रो स्थानक उभारण्याची गरज नाही. त्यातून खर्चातही बचत होईल. तसेच मेट्रो स्थानकापर्यंतचे अंतरही कमी होईल, असे सांगण्यात येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.