कोविडच्या नव्या रुग्णांमध्ये दैनंदिन २५.४६ टक्के घट

नोव्हेंबर महिन्यातील गेल्या दोन आठवड्यात कोरोना रुग्णांच्या नव्या नोंदीत तब्बल २५.४६ टक्के घट दिसून आली. राज्यातला मृत्यूदरही बऱ्याच प्रमाणात घटला आहे. यंदाच्या आठवड्यात केवळमध्ये तीन रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू पावले.
दोन आठवड्यापूर्वी कोरोनाचे दरदिवसाला १ हजार ३७ रुग्ण दिसून यायचे. आता हीच संख्या ७७३ पर्यंत पोहोचली आहे. साप्ताहिक मृत्यूदर ०.३९ पर्यंत कमी झाला आहे. सोमवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २९ नव्या रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८१,३५,२४२ इतकी झाली आहे.
मात्र अकोला, पुणे, कोल्हापूर, जालना आणि सांगली या जिल्ह्यांची साप्ताहिक पॉझीटीव्हीटी दोनपेक्षा अधिक आहे. आतापर्यंत राज्यात मुंबई (७२) पुणे (४६) ठाणे ( ८) नागपूर भंडारा प्रत्येकी दोन, अकोला अमरावती कोल्हापूर प्रत्येकी एक असे एकूण १३४ एक्स बीबी व्हेरियंट सापडले आहेत. मात्र, या भागात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here