दख्खनचा (Dakhkhan) राजा जोतिबा (Dakhkhancha Raja Jyotiba) देवाचं चार दिवस दर्शन बंद राहणार आहे. मूळ मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी या काळात देवाची उत्सवमूर्ती व कलश दर्शनासाठी कासव चौक येथे ठेवण्यात येईल. मूळ मूर्ती सुस्थितीत राहावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागाला कळविले होते. (Dakhkhancha Raja Jyotiba)
पुरातत्व विभागाने मूर्तीची पाहणी करून मूर्तीवर रासायनिक संवर्धन (Chemical enrichment) करण्याची सूचना केली. त्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (17 जाने.) मूर्तीची पाहणी केली. जिल्हाधिकारी, गावकरी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारपासून (21 जाने. ) मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याचा निर्णय झाला आहे. (Dakhkhancha Raja Jyotiba)
हेही वाचा-Donald Trump : अमेरिकेत ट्रम्प पर्वाचा प्रारंभ; आज घेणार शपथ
21 पासून ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. 24 जानेवारीपर्यंत संवर्धनाचे हे काम सुरू राहणार आहे. या कालावधीत मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे. रासायनिक प्रक्रियेमुळे मूळ मूर्तीचे दर्शन मंगळवारपासून शुक्रवार अखेर भाविकांना घेता येणार नाही. या कालावधीत कासव चौकात उत्सवमूर्ती व कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकांनी कलश व उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन, सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले. (Dakhkhancha Raja Jyotiba)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community