Khadakwasla Dam: पुण्यासाठी धोक्याची घंटा; धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवणार

4560
Khadakwasla Dam: पुण्यासाठी धोक्याची घंटा; धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवणार
Khadakwasla Dam: पुण्यासाठी धोक्याची घंटा; धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवणार

मागील ४८ तास पडलेल्या मुसळधार पावसाने पुण्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे पुण्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. अशातच पुणे शहराजवळील धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी रात्री पुण्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच धरणांमधील पाण्याचा विसर्ग वाढवला (Discharge of water in dams) जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.   (Khadakwasla Dam)

या धरणातून होणार पाण्याचा विसर्ग 

खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) रविवारी (२८ जुलै) रात्री ११ वाजता मुठा नदीपात्रात (Mutha River) पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. यामध्ये रात्री ५ हजार क्युसेकच्या ऐवजी ११ हजार ७०४ क्युसेक पाणी खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. तसेच पावसाच्या अंदाजावरून पाण्याच्या विसर्गात बदल करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  (Khadakwasla Dam)

पुणे जिल्ह्यातील धरणे १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. पुणे शहराजवळील खडकवासला धरण ८० टक्के, पानशेत ९४ टक्के आणि टेमघर ७८ टक्के एवढ्या क्षमतेने भरलेले आहे. तर पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwa) शहराशी सलग्न असलेले पवना धरण ८४ टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पुढील पावसाळा कालावधीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी सतर्क व दक्ष राहणे आवश्यक आहे.  (Khadakwasla Dam)

(हेही वाचा – नागपुरातील रस्ते अपघातासंबंधी केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांचे अधिकाऱ्यांना निर्देश; म्हणाले…)

सखल भागातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी पात्रातील निषिद्ध क्षेत्रात उतरू नये, अशा सूचना पाटबंधारे विभागाने (Pune Irrigation Department) दिल्या आहेत. सद्यस्थितीत खडकवासला व पवना धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू असुन पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्यात येईल. (Dam)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.