Banganga Lake Damage : कंत्राटदाराविरोधात कडक कारवाई करण्याच्या महानगरपालिका आयुक्तांच्या सूचना

1016
Banganga Lake : ‘बाणगंगा’च्या उर्वरीत कामांसाठी नव्या कंत्राटदाराचा शोध सुरु…

बाणगंगा परिसर आणि याठिकाणची मंदिरे यांच्याशी संबंधित कामांमध्ये योग्य आदर ठेवला जाणे अपेक्षित आहे. पुरातत्त्व विभागाशी समन्वय साधत येत्या दिवसात बाणगंगा परिसरातील उर्वरित कामे ही नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी दिल्या. उर्वरित गाळ काढण्याची कामे यापुढच्या काळात हस्तचलित यंत्रणेच्या पद्धतीने करण्यात येतील, असेही भूषण गगराणी नमूद केले. (Banganga Lake Damage)

ऐतिहासिक बाणगंगा तलाव व परिसरात सुरू असलेल्या पुनरूज्जीवन कामांची पाहणी करण्यासाठी दौरा मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुरुवारी २७ जून २०२४ रोजी केला. बाणगंगा तलाव परिसरात संयंत्र उतरवून पायऱ्यांना हानी पोहचवतानाच पुरातत्त्व विभागाच्या नियमांचा भंग करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना गगराणी यांनी दिल्या. त्यासोबतच पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार उर्वरित टप्प्यातील कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच तलावातील गाळ काढण्याचे काम हस्तचलित यंत्रणेद्वारे (मॅन्युअल पद्धतीने) करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. (Banganga Lake Damage)

(हेही वाचा – Hijab Ban : हिजाब बंदीमुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन नाही; मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका)

ऐतिहासिक अशा बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत कामे करताना तलावाच्या उत्तर प्रवेशद्वारावरून आतमध्ये एक्सकॅव्हेटर संयंत्र (Excavator) उतरवून तलावांच्या पायऱयांची हानी केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारास महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच तलावास हानी पोहोचवून नुकसान केल्याबद्दल मलबार हिल पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (FIR) २५ जून २०२४ रोजी दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हानी पोहोचलेल्या पायऱ्या दुरुस्त करण्याची कामे महानगरपालिकेच्या वतीने त्याचदिवशी त्वरित पूर्ववत करून पायऱ्या करण्यात आल्या आहेत. तसेच यापुढच्या काळात उर्वरित कामेही पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. तलावाच्या पायऱ्यांची हानी केल्याबद्दल बाणगंगा प्रकल्पाचे कंत्राटदार सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. (Banganga Lake Damage)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.