स्वप्नील सावरकर
नव्या कॅलेंडर वर्षाचं स्वागत देशभरात आणि राज्यात अनेक प्रकारे उत्साहात केलं गेलं आहे. खरंतर, हिंदू वर्ष गुढी पाडव्याला सुरू होत असलं तरी, आपण कॅलेंडर वर्षही तितक्याच उत्साहात साजरं करून आपली सहिष्णुता दरवर्षी दाखवून देत असतो. असो, पण २०२५ हे वरीस धोक्याचं असं म्हणण्याचं कारण म्हणजे या वर्षाची सुरुवात होताना काही घटनांनी भविष्यात काय घडू शकतं, याची प्रचिती दिली आहे. जगभरात सुरू असलेली युक्रेन-रशिया (ukraine russia war), इस्रायल-हमास (israel hamas war, मुस्लिम राष्ट्रे) यासारख्या युद्धांनी अजूनही परिस्थिती बिकट असल्याचेच दाखवून दिलं आहे. आपल्या शेजारच्या पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, अफगाणिस्तानसारख्या देशांची स्थितीही तशीच आहे. (New Year 2025)
(हेही वाचा – Chhattisgarh मध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 4 नक्षलवादी ठार, DRG चा एक जवान हुतात्मा)
अस्थिरतेसाठी वाट्टेल ते…
हे झालं आंतरराष्ट्रीय स्थितीचं वर्णन. पण, आपल्या घरात काय चाललंय? देशाची, राज्याची स्थिती पाहिली तर बांगलादेशचे (bangladesh unrest) पत्रकार सलाउद्दीन शोएब चौधरी यांनी हिंदुस्थान पोस्टला दिलेल्या मुलाखतीतील वाक्य आठवते. ते म्हणाले होते, बांगलादेशप्रमाणेच भारतातही डीप स्टेटद्वारे अस्थिरता माजवण्यासाठी षडयंत्रे आखली जात आहेत. त्यासाठी अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही राजकारण आणून आंदोलनं, दंगली माजवण्याचे कट रचले जात आहेत. त्यांनी तर या कटात सहभागासाठी थेट काँग्रेससारख्या पक्षांचे नाव घेत राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीयांवर शरसंधान केलं आहे. ही मुलाखत हिंदुस्थान पोस्टच्या युट्युब चॅनेलवर सविस्तर पाहता येईलच. पण त्यांनी दिलेल्या इशाऱ्यांनुसार अनेक गोष्टी आता घडताना दिसू लागल्या आहेत.
देशात मोदी सरकार निवडून येताना महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातल्या मतदानामुळे थोडीफार दमछाक झाली होती. परंतु, महाराष्ट्रातल्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत ही चूक सुधारत, महाकाय बहुमत देत हिंदुत्ववादाला झुकतं माप दिलं आणि भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचं सरकार स्थापन झालं. अगदी विरोधी पक्षनेताही बसवता येणं विरोधी काँग्रेस, उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला अशक्य झालंय. पण, असं असलं तरी पवारप्रेमी मीडियाला हाताशी धरून अस्वस्थता निर्माण करण्याचे पूर्ण प्रयत्न केले जाताना दिसत आहेत. अगदी मस्साजोग सरपंच हत्येचं प्रकरण असो किंवा ईव्हीएमविरोधी महाविकास आघाडीची मोहीम असो, ही उदाहरणं वानगीदाखल घेता येतील.
दहशतवादी हल्ल्यांऐवजी अपघातांचे कट-कारस्थान?
परंतु, हे सर्व एका बाजूला घडत असतानाच वर्षारंभीच घडलेल्या एका छोट्या परंतु न घडलेल्या अपघाताच्या घटनेकडे तुमचं लक्ष वेधणं गरजेचं आहे. ही घटना आहे ती विरारजवळ रुळ वाकल्याचे लक्षात आल्याने टळलेल्या एका अपघाताच्या बातमीची. विरारहून निघालेली गाडी मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे रुळावरून घसरता घसरता वाचली. एसी लोकल जर यावरून घसरली असती तर लोकलमधील हजारो लोकांचं काय झालं असतं, याचा विचारच करवत नाही. रुळ वाकले की वाकवले, अशी शंका येईल असे फोटो सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाले. हा अपघात टळला असला तरी गेल्या काही महिन्यांमध्ये झालेले रेल्वे अपघात पाहता हे अपघात म्हणजे दहशतवादी हल्लेच आहेत की काय, अशी शंका घ्यायला पूर्ण वाव आहे. कालची विरारची (virar) घटना म्हणजे मुंबईसारख्या शहरासाठी धोक्याची घंटाच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर शांतताप्रेमी समाजातली तरुणतुर्क मंडळी विविध ठिकाणच्या रेल्वे रुळांवर दगडं, लोखंडी रॉड, सिमेंटचे स्लॅब्स टाकताना दिसली आहेतच. अनेक घटना आधीच लक्षात आल्यामुळे अपघात टळल्याच्या बातम्याही आपण पाहतोच आहोत. पण, विरारची घटना अधिक महत्त्वाची वाटते. कारण, एकच रुळ ज्याप्रमाणे वाकवण्यात आलाय तो पाहता हे कृत्य आधुनिक उपकरणांच्या साह्याने आणि अत्यंत गुप्तपणे तसेच कमी वेळात केल्याचे जाणवते. ही घटना घडली त्या भागाच्या जवळपासची वस्तीही या शांतताप्रेमी समाजाचीच असल्याचे सांगितले जात आहे. थोडक्यात काय, तर आता आपल्या सुरक्षेची जबाबदारी आपणच उचलायची आहे. अन्यथा, अपघातानंतर सरकारवर जबाबदारी टाकून त्याचंही राजकीय भांडवल करण्यासाठी ‘टूलकिट’ तयार आहेच! (New Year 2025)
(लेखक ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community