नेपियन्सी रोड, बाबूलनाथ परिसरातील डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका

या  परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या  सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.

149

नेपियन्सी मार्ग, बाबूलनाथ परिसरातील डोंगर भागांत दरड कोसळण्याची भीती वर्तवली जात असून या भागांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना धोक्याचा इशारा दिला आहे. दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या डी  विभागांमधील संभाव्य धोका असलेल्या दरड कोसळणाऱ्या ठिकाणांची यादी जाहीर करून येथील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ही ठिकाणे धोक्याची!

मुंबई  महापालिकेच्या ‘डी’ विभागातील नेपियन्सी मार्गालगतच्या परिसरातील आशानगर झोपडपट्टी आणि जलदर्शन सोसायटीच्या मागील भाग, फोर्जेट हिल परिसरातील नवयुग सोसायटी आणि चंदुलाल धोबीघाटच्या पाठीमागील भाग, ब्रिच कँडी रुग्णालयाजवळील भुलाभाई देसाई मार्गालगत असणा-या राजाबली लेनचा शेवटचा भाग,  फोर्जेट हिल येथील रहिवाशी नगर, मणीयार इमारतीच्या मागील भाग, बी. एन. वाडीया चाळ व एम. पी. मिल कंपाऊंड (जनता नगर) च्या मागील भाग, बाबुलनाथ परिसरातील लोयलका कंपाऊंड, पथ्थरवाला चाळीच्या मागील भाग, दादीशेठ लेनचा भाग; इत्यादी ठिकाणे ही दरडी कोसळण्याची संभाव्य ठिकाणे आहेत. तरीही या  परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या  सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.

(हेही वाचा : आरटीईअंतर्गत पात्र पाल्यांच्या शाळा प्रवेशासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ!)

या अनुषंगाने अणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास इथे एकत्र यावे!

  • केवळे मठ मनपा शाळा, बाणगंगा, वाळकेश्वर
  • ताडदेव मनपा शाळा, बने कंपाऊंड, ताडदेव

दरडी कोसळण्याचा धोका जाणवल्यास काय कराल?

  • तात्काळ उपरोक्त नमूद दूरध्वनी क्रमांकावर घटनेची माहिती द्यावी.
  • जवळपासच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी उभे करावे
  • घरातून बाहेर पडताना गॅस कनेक्शन, विद्युत प्रवाह बंद करावे
  • घरातून बाहेर पडल्यानंतर घरातील मौल्यवान सामान आणण्याकरीता पुन्हा घरात प्रवेश करु नये
  • पळापळ करु नये, अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेऊ नये
  • अग्निशमन अथवा महापालिकेचे अधिकारी येऊन पाहणी करुन गेल्याशिवाय घरात प्रवेश करु नये

दरड कोसळल्यास काय कराल?

  • मदत कार्य करीत असताना दरड कोसळलेल्या ढिगा-यावर उभे राहू नये
  • जखमी झालेल्या व्यक्तिंना त्वरित रुग्णालयात पोहोचवावे. लहान मुले, वृद्ध, अपंग, गरोदर महिला यांची प्राधान्याने काळजी घ्यावी.
  • मदत कार्य करणा-या यंत्रणांना अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • ढिगा-याखाली अडकलेल्या व्यक्तिंबद्दल माहिती असल्यास ती मदत करणा-या यंत्रणांना द्यावी.

(हेही वाचा : तयार गणेश मूर्ती विकणाऱ्या व्यावसायिकांना मंडपासाठी परवानगी नाही!)

खबरदारीचे व संरक्षणात्मक उपाय म्हणून काय कराल?

  • दीर्घकाळ, जोरदार पाऊस पडल्यास सतर्क रहावे.
  • दगडमातीचा प्रवाह, झाडे पडणे, दगडांचा एकमेकांमधील टकरीचा आवाज अशा प्रकारच्या अनैसर्गिक आवाजांकडे लक्ष द्यावे.
  • कुटुंबातील सदस्यांची वैयक्तिक माहिती असणारे कार्ड तयार करावे. ज्यामध्ये व्यक्तिचे नाव, पत्ता, रक्तगट, कार्यालयाचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक, नातेवाईकांचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक, ऍलर्जी असलेल्या औषधांची नावे, गंभीर आजार असल्यास त्याचे नाव व त्याकरीता घेत असलेल्या औषधांची नावे अशा माहितीचे कार्ड तयार करावे.
  • घरात जीवनावश्यक वस्तुंचा संच उदा. सुका खाऊ, पाण्याच्या बाटल्या, टॉर्च, शिटी इत्यादी तयार ठेवावा.

कुठे संपर्क साधाल?

  • अणीबाणी प्रसंगाकरीता मदतसेवा क्रमांकः मनपा मुख्यालय नियंत्रण कक्ष – १९१६,
  • पोलिस – १००, अग्निशमन दल – १०१, रुग्णवाहिका – १०८.
  • विभागीय नियंत्रण कक्षः ०२२-२३८६४०००
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.