नक्षलवाद्यांकडून रेल्वे ट्रक उडवून देऊन मोठे रेल्वे अपघात घडवून आणण्याचे षडयंत्र रचले जाते, असा घातपात घडवून आणण्याचा प्रकार नक्षलवाद्यांचा जुनाच आहे. मात्र तो सध्याच्या परिस्थितीत अत्यंत धोकादायक ठरू शकतो, त्याला कारणही तसेच आहे. झारखंडमधील चाईबासामध्ये नक्षलवाद्यांनी सोनुआ आणि चक्रधरपूर या दरम्यान रेल्वे ट्रक उडवला. त्यानंतर सुदैवाने हे तात्काळ लक्षात आल्याने रेल्वे रुळ दुरुस्त करण्यात आले. मात्र सध्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये कोरोनाने थैमान घालणे सुरु केले आहे. रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, मात्र त्याचा तुटवडा आहे. त्यामुळे ऑक्सिजन टँकरची वाहतूक थेट रेल्वे मार्गाने सुरु आहे. अशा वेळी नक्षली षडयंत्राचा मोठा फटका या ऑक्सिजन रेल्वेला होऊ शकतो, पर्यायाने देशाला याचा फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
Naxals blew up a railway track b/w Sonua & Chakradharpur last night between 2-3 am. Anti-sabotage check done & restoration work completed jointly by dist police, Bomb Detection & Disposal Squad, RPF & railway trackmen. Traffic restored on other tracks: SP Chaibasa#Jharkhand pic.twitter.com/BEH9VQwJLT
— ANI (@ANI) April 26, 2021
सुदैवाने मोठा अपघात टळला!
रविवार, २५ एप्रिल रोजी रात्री उशिरा हा प्रकार घडला. त्या दरम्यान जर कोणती ट्रेन गेली असती, तर मोठा अपघात घडला असता. मात्र गॅंगमॅनच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिल्यावर ताबडतोब रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. आता या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली आहे.
पोलिसांनी ५०० डेटोनेटर जप्त केले!
दरम्यान या घटनेच्या आधीच झारखंड जिल्ह्यातील गिरिडीह जिल्ह्यातील बेंगाबाद पोलिसांनी येथील गावात छापा मारून सुमारे ५०० डेटोनेटर आणि जिलेटीन आणि तारा जप्त केल्या होत्या. पोलिसांना या साठ्याविषयी गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र त्याच वेळी अंधाराचा फायदा घेऊन घराचा मालक पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी पोलिसांनी २ ज्यांना अटक केली.
ऑक्सिजन रेल्वेला लक्ष्य करण्याची शक्यता?
या घटनेमुळे नक्षली भागातील रेल्वे रुळांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या देशात विविध राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यातच ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ऑक्सिजनअभावी रुग्नांचे मृत्यू होऊ लागले आहेत. अशा वेळी देशांतर्गत राज्ये एकमेकांना ऑक्सिजनचा पुरवठा करू लागले आहेत. यासाठी रेल्वे वाहतुकीचा वापर होत आहे. नुकतेच विशाखापट्टणम येथून महाराष्ट्रात ऑक्सिजनचे टँकर घेऊन रेल्वे महाराष्ट्रात पोहचली आहे, असा प्रकारे अन्य राज्यांतही आता अशा रेल्वे धावणार आहेत, अशा वेळी जर नक्षलवाद्यांनी रेल्वे रूळ उडवून ऑक्सिजनची वाहतूक करण्याऱ्या रेल्वेला लक्ष्य केले तर देशभरात हाहाकार माजेल. त्यामुळे पोलिसांसह केंद्रीय गृहमंत्र्यांनी याची गंभीरपणे दाखल घेतली पाहिजे.
Join Our WhatsApp Community