मलबार हिलमधील पाण्याची टाकी धोकादायक

147

दक्षिण मुंबईला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या मलबार हिल टेकडी जलाशयाचे आयुर्मान संपले असून, आता ही टाकी धोकादायक बनली आहे. त्यामुळे या टाकीचे पुनर्बांधकाम करणे आवश्यक बनले आहे. सात वर्षांपूर्वी केलेल्या पाहणीमध्ये या टाकीच्या पुनर्बांधणीचे काम आता महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत आहे.

१४० वर्षे जुनी टाकी

फिरोजशहा मेहता उद्यानातील मलबार हिल येथे दक्षिण मुंबईतील कुलाबा ते मुंबई सेंट्रलच्या भागातील जनतेला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी १४७.७८ दशलक्ष लिटर क्षमतेची साठवण टाकी आहे. ही साठवण टाकी १४० वर्षे जुनी आहे. त्यामुळे या जलाशयाचे स्ट्रक्चरल ऑडिट जुलै २०१७ मध्ये करण्यात आले. तांत्रिक सल्लागार डी.डी. कुलकर्णी यांच्यासह आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांच्या मदतीने केलेल्या पाहणी अहवालामध्ये, या जलाशयाचे आयुर्मान संपल्याने त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचाः मुंबईच्या माजी महापौरांसह १० जणांना अटक)

तात्पुरती टाकी बनवली जाणार

या जलाशयामध्ये एकूण पाच कप्पे असून, या जलाशयाच्या साठवण टाकीच्या बांधकामासाठी टोटल स्टेशन सर्वे, तांत्रिक सल्लागार पेडणेकर आणि असोसिएट्स यांच्याकडून घेण्यात आला आहे. जुन्या मलबार हिल जलाशयाच्या पश्चिम दिशेलगत २३ दशलक्ष लिटर क्षमतेचा अतिरिक्त जलाशय बांधण्यात येणार असून, या भागातील पाण्याचा पुरवठा खंडित होवू नये म्हणून १४ दशलक्ष लिटर क्षमतेची तात्पुरती साठवणुकीची टाकी बनवली जाणार आहे.

इतका खर्च होणार

मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी केल्यानंतर त्याचे पुढील आयुर्मान १०० वर्षे असेल, अशाप्रकारे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी विशिष्ट प्रकारचे बांधकाम केले जाणार आहे. या जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी पुढील पाच वर्षांमध्ये केले जाणार आहे. याकरता ६९८.९५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामासाठी स्काय वे इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली आहे. या प्रकल्पाचे काम चालू असताना ध्वनी प्रदूषण नियंत्रणाकरता बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरते ध्वनी अवरोधक उभारले जातील. ज्याद्वारे ध्वनी प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न होणार आहे.

(हेही वाचाः मुंबई महापालिकेची विक्रमी करवसुली : ५,७९२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.