बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात श्रीराम विवाह यात्रेवर कट्टरपंथी मुस्लिमांनी दगडफेक केली आहे. यात्रा जशी एका मशिदीवर पोहचली, तसे तिथे शोभायात्रेत सहभागी झालेल्या लोकांना दगड, विटांनी हल्ला करण्यात आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र तणावपूर्ण परिस्थितीमुळे घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Shree Ram)
( हेही वाचा : Kisan Pehchan Patra : केंद्र सरकारच्या नवीन शेतकरी ओळखपत्राविषयी सर्व माहिती वाचा एका क्लिकवर)
दरवर्षी विवाह पंचमी निमित्त बाजितपुर आणि तरौनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भगवान श्रीराम (Shree Ram) यांच्या विवाह यात्रेचे आयोजन केले जाते. ही यात्रा तरौनी गावातून बाजितपुरकडे जात होती. त्यादरम्यान बाजितपुर येथील मशिदीजवळ यात्रा पोहचताच कट्टरपंथी मुस्लिमांनी शोभायात्रेतील लोकांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
काही वेळातच मशिदीच्या परिसरात दगडफेक सुरु झाली. त्यानंतर कट्टरपंथींनी लाठीकाठीद्वारे शोभायात्रेतील लोकांवर हल्ला केला. यासंदर्भातील माहिकी मिळताच एसडीओ, सिटी एसपी, डीएसपी आणि अन्य अधिकाऱ्यांसह पोलिस दलही घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध कवी नागार्जुन हे याचं गावातील रहिवाशी होते. (Bajitpur)
दरम्यान दरभंगा बाजितपुरमध्ये (Bajitpur) ज्या ठिकाणी विवाह पंचमीची शोभायात्रा निघाली होती, त्याठिकाणी कट्टरपंथींनी लोकांसोबत मारहाण केली. लोकांचे म्हणणे आहे की, गेल्या २० वर्षांपासून अधिक वर्षांपासून राम (Shree Ram) विवाह यात्रा या रस्त्यावरून निघते. मात्र याआधी असे कधीच घडले नव्हते. परंतु यावेळी मशिदीजवळ पोहचताच धर्मांधांनी दगडफेक केली.
याप्रकरणी शहर एसपी अशोक कुमार (Ashok Kumar) म्हणाले की, कोणत्या कारणामुळे दगडफेक केली गेली, तणावपूर्ण स्थिती निर्माण केली गेली याचा पोलिस तपास करत आहेत. तपासानंतर मिळालेल्या माहितीनुसार कटात सहभागी असलेल्या लोकांवर कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी सीसीटिव्ही फुटेज तपासले जात आहेत. (Bajitpur)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community