Mumbai Police : मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त पदी दत्ता नलावडे; तर प्रकटीकरण-१ पदी विशाल ठाकूर

मुंबईतील सेलिब्रेटी झोन म्हणून ओळख असणाऱ्या परिमंडळ ९ च्या उपायुक्त पदी राजतिलक रोशन यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलात मागील १५ दिवसांपूर्वी पोलीस उपायुक्त यांच्या राज्यस्तरीय बदल्या करण्यात आलेल्या होत्या, त्यातील अनेक पोलीस उपायुक्त (D.C.P) यांची मुंबई बाहेर बदली झाल्यामुळे अनेक परिमंडळ रिक्त झाले होते.

360
Assembly Election : राज्यातील पोलिसांच्या रजा रद्द

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस दलात फेरबदल करण्यात आलेले असताना मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात देखील हे फेरबदल दिसून येत आहे. मागील अनेक महिन्यापासून रिक्त असलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त पदावर अखेर नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या (प्रकटीकरण) पदी परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे तर प्रकटीकरण-१ पदी पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली आहे. (Mumbai Police)

मुंबईतील सेलिब्रेटी झोन म्हणून ओळख असणाऱ्या परिमंडळ ९ च्या उपायुक्त पदी राजतिलक रोशन यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात मागील १५ दिवसांपूर्वी पोलीस उपायुक्त यांच्या राज्यस्तरीय बदल्या करण्यात आलेल्या होत्या, त्यातील अनेक पोलीस उपायुक्त (D.C.P) यांची मुंबई बाहेर बदली झाल्यामुळे अनेक परिमंडळ रिक्त झाले होते. दरम्यान सोमवारी मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात रिक्त झालेल्या ठिकाणी तसेच अंतर्गत बदल करण्यात आलेले आहेत. (Mumbai Police)

(हेही वाचा – Hotels In Ayodhya : भविष्यात तुम्ही अयोध्येला जाणार असाल तर ‘या’ हॉटेल्सचा नक्की विचार करा)

यांची करण्यात आली नेमणूक 

परिमंडळ ९ चे (सेलिब्रेटी झोन) पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांची परिमंडळ-३ येथे बदली करण्यात आली असून परिमंडळ ३ पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांची (अभियान) येथे बदली करण्यात आली आहे. रिक्त असलेल्या परिमंडळ ५ येथे मुख्यालय-२ च्या (HQ-2) पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची नेमणूक करण्यात आली आहे. तेजस्वी सातपुते यांनी गेल्या वर्षी सर्वात मोठ्या पोलीस भरतीचे निरीक्षण केले होते, व योग्यरित्या भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. विशेष कृती दलाचे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांची परिमंडळ १० येथे नेमणूक करण्यात आली. (Mumbai Police)

पोलीस उपायुक्त समाधान पवार सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन ते मध्य मुंबई वाहतूक, रागसुधा आर पोलीस अधीक्षक परभणी ते अंमलबजावणी गुन्हे शाखा, मितेश घट्टे पुणे ग्रामीण ते वाहतूक पश्चिम उपनगर, आनंद भोईटे पुणे ग्रामीण ते परिमंडळ ११, दत्तात्रय कांबळे अकोला ते मुंबई विशेष शाखा, वैशाली शिंदे नागपूर लोहमार्ग ते सशस्त्र शाखा वरळी, महेश चिमटे संरक्षण ते मुख्यालय-१, श्याम घुगे सुरक्षा ते अमली पदार्थ विरोधी पथक मुंबई, प्रकाश जाधव अमली पदार्थ विरोधी पथक ते संरक्षण आणि प्रज्ञा जेडगे सशस्त्र पोलीस नायगाव ते वाहतूक दक्षिण मुंबई. (Mumbai Police)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.