दत्तात्रय होसबळे संघाचे नवे सरकार्यवाह!

संघाच्या बंगळूर येथील प्रतिनिधी सभेत होसबळे यांच्या नावाची सरकार्यवाहपदी घोषणा करण्यात आली.

131

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळूर येथील अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची निवड करण्यात आली आहे.

बंगळूर येथील सभेत घोषणा

संघाच्या बंगळूर येथील प्रतिनिधी सभेत होसबळे यांच्या नावाची सरकार्यवाहपदी घोषणा करण्यात आली. त्यांच्यासोबत या पदासाठी भैय्याजी जोशी आणि सुरेश सोनी यांची नावे सुद्धा चर्चेत होती. १९ आणि २० मार्च अशी दोन दिवस बंगळूर येथे संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ४४ प्रांतांतील स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे.

होसबळेंचा अल्प परिचय

  • कर्नाटकच्या शिमोगा येथील दत्तात्रय होसबळे यांनी २००८ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सह सरकार्यवाह पदाची धुरा सांभाळली होती.
  • १९६८ साली वयाच्या अवघ्या १३व्या वर्षापासून ते संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत.
  • १९७२ पासून १५ वर्षांपर्यंत ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटन मंत्री म्हणून त्यांनी काम केले.
  • १९७५-७७ मधील जयप्रकाश नारायण यांनी पुकारलेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच याच काळात जवळपास दोन वर्ष तुरुंगवासही भोगला.
  • अंदमान-निकोबार द्वीपसमूह तसेच पूर्वोत्तर भारतात विद्यार्थी परिषदेच्या कार्य प्रसारात त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले.
  • २००४ साली त्यांची संघाच्या अखिल भारतीय सह-बौद्धिक संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती.
  • असीमा या कन्नड मासिकाचे संपादक म्हणऊन त्यांनी कार्य केले.
  • इंडिया पॉलिसी फाउंडेशनचे संस्थापक विश्वस्त पदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला.

काय आहे सभेचे स्वरुप

अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक दर तीन वर्षांनी घेण्यात येते. या सभेत तीन वर्षांतील संघाच्या वाटचालीचा आढावा घेण्यात येतो. संघाच्या कार्य विस्तारावर सुद्धा या सभेत विचारमंथन केले जाते. तसेच मतदानाद्वारे सरकार्यवाहांची निवड करण्यात येते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.