दाउदचा भाऊ इकबाल कासकरची रवानगी तुरुंगात!

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या मुंबई विभागाने मागील आठवड्यात जम्मू येथून मुंबईत आलेले १५ किलो चरस हा अमली पदार्थ आणि दोन मोटारसायकल जप्त केल्या होत्या.

65

जम्मू येथून मुंबईत आलेल्या चरस तस्करी प्रकरणी एनसीबीने ताब्यात घेतलेल्या इकबाल कासकर याची १५ तास चौकशी केल्यानंतर पुन्हा ठाणे तुरुंगात त्याची रवानगी केली आहे. या चौकशीत त्याने या चरसशी माझा काही संबंध नसल्यचे एनसीबीला सांगितले असल्याचे समजते.

जम्मू येथून चरस, मोटारसायकल मुंबईत आणले होते!  

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या मुंबई विभागाने मागील आठवड्यात जम्मू येथून मुंबईत आलेले १५ किलो चरस हा अमली पदार्थ आणि दोन मोटारसायकल जप्त केल्या होत्या. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेले दोघे पंजाब येथील नागरिक असून त्यांनी जम्मू येथून चरस, मोटारसायकल मुंबईत आणले होते. एनसीबीने या दोघांना अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इकबाल कासकर याच्यासाठी काम करीत असल्याची कबुली दिली होती. याप्रकरणी एनसीबीने ठाणे तुरुंगात मागील ३वर्षांपासून असलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याला या संदर्भात चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडे ताबा मागितला होता.

(हेही वाचा : हॉटेल ताजवरील हल्ल्याची ‘ती’ धमकी ठरली अफवा! )

२००७ साली अमली पदार्थाची देवाणघेवाण झाली!

दरम्यान न्यायालयाने इकबाल याला एक दिवसाची एनसीबी कोठडीत सुनावली होती. शुक्रवारी एनसीबीने ठाणे तरुंगातून इकबाल याचा ताबा घेऊन त्याच्याकडे १५ तास केलेल्या चौकशीत त्याने माझा यांचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे, मात्र एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २००७ साली या दोघांनी इकबाल याला अमली पदार्थाची देवाणघेवाण झाली होती. अखेर १५ तास चौकशी केल्यानंतर शनिवारी इकबालला याची पुन्हा ठाणे तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.