‘अंडरवर्ल्ड डॉन (Underworld Don) दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) विषप्रयोग’, ‘दाऊद रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे’, ‘दाऊदचा मृत्यू झाला’ या सोशल मीडियावरील वृत्ताने सोमवारचा दिवस चांगलाच गाजला. दाऊदवर विषप्रयोग झाला असल्याच्या वृत्ताने देशातच नव्हे, तर जगभरात खळबळ उडवून दिली. दाऊदसाठी हे नवीन नाही. मागील ७ वर्षांत त्याला ५ वेळा मृत्यूच्या दारात आणून ठेवले आहे.
(हेही वाचा – Salim Kutta : सलीम कुत्तामुळे तापले अधिवेशन; खडसेंचे आरोप, सत्ताधाऱ्यांचे पलटवार)
अनेकांनी दाऊदला वाहिली श्रद्धांजली
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) हा सध्या पाकिस्तानस्थित (Pakistan) कराची शहरात स्थायिक झाला आहे. दाऊद याच्यावर विषप्रयोग (Dawood Poisoned) करण्यात आला आहे. त्याला कराचीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी बातमी आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी दाऊदला (Underworld Don) श्रद्धांजलीदेखील वाहिली.
दाऊदवर विषप्रयोग झाल्याचा वृत्ताला कोणीही अधिकृत दुजोरा दिला नाही. जसजसा दिवस मावळत गेला, तसे या वृत्ताचा सोशल मीडियावरील ज्वर कमी झाला. दाऊदच्या निधनाचे वृत्त देशवासियांना, तसेच मुंबईकरांना (Mumbai) नवीन नाही. दाऊदच्या निधनाच्या अफवेची ही पाचवी वेळ आहे.
(हेही वाचा – Maratha Reservation : न्या. शिंदे समितीचा दुसरा अहवाल सादर)
आतापर्यंतचे कधी कधी आल्या दाऊदच्या मृत्यूच्या बातम्या ?
२०१६ – दाऊदचा गॅंगरीगने मृत्यू
२०१७ – हृदयविकाराच्या झटक्याने दाऊदचा मृत्यू
२०१८ – दाऊद हा गंभीर आजारी असून त्याला मधुमेह वाढला असून त्याची फुप्फुसे निकामी
२०२० – दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू
२०२३ – दाऊद वर विषप्रयोग (Dawood Ibrahim)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community