लहान मुलांच्या Mobile वापरावर निर्बंध आणण्याचा ‘या’ समाजाचा निर्णय; शाळांमध्ये जनजागृती करणार

१५ वर्षांखालील मुलांना मोबाईल वापरावर आळा आणावा, अशी मागणी या समाजाची आहे.

229
सध्या लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा (Mobile) वापर होत आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे, म्हणून आता दाऊदी बोहरा समाजाने लहान मुलांच्या मोबाईल वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शाळांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. १५ वर्षांखालील मुलांना मोबाईल वापरावर आळा आणावा, अशी मागणी या समाजाची आहे.
दाऊदी बोहरा समाजाकडून जागतिक स्तरावर अशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. मोबाईलच्या (Mobile) अतिवापराचा लहान मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. यासंदर्भात डॉक्टर्स, मानसोपचारतज्ज्ञ यांच्या कार्यशाळाही आयोजित केल्या जात आहेत. लहान मुलांना त्यांच्या मानसिक विकासाच्या अवस्थेमध्ये मोबाईल दिला जाऊ नये. मोबाईलच्या माध्यमातून सोशल मिडिया आणि इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा वापर मुलांमध्ये वाढू लागला आहे. त्यातून सायबरबुलिंग,ऑनलाईन फसवणूक, आक्षेपार्ह मजकूर सहज उपलब्ध होणे असे प्रकार घडू लागले आहेत. मुले फसवणुकीच्या प्रकारांमध्ये अडकून मोठे नुकसान करून घेऊ शकतात, अशीही भूमिका या समाजाकडून मांडली जात आहे. (Mobile)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.