Senior Citizens Day Care Center : वृध्दांसाठी मुंबईत लवकरच डे केअर सेंटर

प्रायोगिक तत्वावर आठ प्रभागांमध्ये हे डे केअर सेंटर उभारले जाणार असल्याची माहिती शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केले.

123
गोरेगावमध्ये ज्येष्ठांसाठी Day Care Center आणि लहान मुलांचे पाळणाघर लवकरच होणार सुरु

मुंबईत अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच डे केअर सेंटर उभारले जाणार असून मुंबईतील सर्वच वॉर्डांमध्ये हे सेंटर उभारले जातील. प्रायोगिक तत्वावर आठ प्रभागांमध्ये हे डे केअर सेंटर उभारले जाणार असल्याची माहिती शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केले. (Senior Citizens Day Care Center)

शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी मुंबई महापालिकेतील वार्ताहर कक्षाला भेट घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी आपण सोमवार, मंगळवार व बुधवार हे तीन दिवस मुंबईत असून तर उर्वरीत दिवस हे आपल्या मतदार संघात अर्थात कोकणात असू असे स्पष्ट करत प्रत्येक बुधवारी आपण जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका मुख्यालयात जनता दरबार आयोजित केले जातील. त्यामाध्यमातून मुंबईतील जनतेच्या समस्या आपण सोडवण्याच्या प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. (Senior Citizens Day Care Center)

मुंबईत अनेक घरांमध्ये कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या मुलांना आपल्या वृध्द आई वडिलांना एकटे ठेवून जावे लागते. त्यातच कामावर गेल्यानंतर दिवसभर त्यांची काळजी घेण्यासाठी प्रामाणिक व्यक्तीही मिळत नाही. अनेकांना आपल्या आई वडिलांना तसेच घरातील ज्येष्ठ व्यक्तीला घरात एकटे ठेवून जावे लागत असल्याने अशा ज्येष्ठ नागरिक तसेच वृध्दांसाठी मुंबईत डे केअर सेंटरची संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशात ज्याप्रमाणे अशा नागरिकांसाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करून त्यांना डे केअर सेंटरमध्ये ठेवून त्यांना इतरांसह दिवस आनंदामध्ये घालवता यावे अशाप्रकारची व्यवस्था करण्यात येते. त्याप्रमाणेच ज्येष्ठांसाठी डे केअर सेंटरची व्यवस्था मुंबईतील सर्व प्रभागांमध्ये निर्माण करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यात आठ वॉर्डांमध्ये हे डे केअर सेंटर निर्माण केले जाणार आहेत. यासर्वांचे काम सुरू असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. (Senior Citizens Day Care Center)

(हेही वाचा – Mumbai Pune Express highway :मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर एक तासाचा ब्लॉक, जाणून घ्या वेळ?)

जुन्या हेरिटेज इमारतींना लिफ्टची सुविधा

मुंबईमध्ये अनेक जुन्या इमारती हे हेरिटेज वास्तूमध्ये येत असून त्यांचा पुनर्विकास होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची दुरुस्ती करण्याची परवानगी देण्याची सुचना केली असून त्या इमारतींना रंगरंगोटी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अनेक इमारती या पाच मजल्यांच्या असून ज्या इमारतींचे बांधकाम चांगले आहे. त्यांना बाहेरुन बांधकाम करून लिफ्टची सुविधा देण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हेरिटेज वास्तूंमध्ये मोडणाऱ्या इमारतींचे बांधकाम चांगले असल्यास त्यांना लिफ्ट बसवण्याची सुविधा उपलब्ध करून घेता येऊ शकते, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. (Senior Citizens Day Care Center)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.