DCM Devendra Fadanvis: आषाढी एकादशीनिमित्त ‘बा पांडुरंग’ आणि वारकरी माऊलींना उपमुख्यमंत्र्यांकडून वंदन

152
DCM Devendra Fadanvis: आषाढी एकादशीनिमित्त 'बा पांडुरंग' आणि वारकरी माऊलींना उपमुख्यमंत्र्यांकडून वंदन
DCM Devendra Fadanvis: आषाढी एकादशीनिमित्त 'बा पांडुरंग' आणि वारकरी माऊलींना उपमुख्यमंत्र्यांकडून वंदन

आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2024) ‘बा पांडुरंग’ भेटीच्या ओढीने शेकडो किलोमीटर पायी चालून पंढरपूरला पोहोचलेल्या वारकरी माऊलींच्या तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत ‘बा पांडुरंगा’ च्या चरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केले असून “राज्यात पाऊसपाणी चांगले होऊदे, शेतकऱ्यांच्या शेतात पिकांची, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची सुबत्ता येऊदे, राज्यातली मायमाऊली आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊदे, समाजातली एकजूट, बंधुत्वाची भावना कायम राहूदे, महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी आम्हाला शक्ती दे,” असे साकडे ‘बा पांडुरंगाला’ घातले. (DCM Devendra Fadanvis)

(हेही  वाचा – IAS Pooja Khedkar यांची निवड होणार रद्द? काय म्हणतात अविनाश धर्माधिकारी?)

आषाढी एकादशीनिमित्ताने (Ashadhi Ekadashi 2024) जनतेला दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी, पांडुरंगाची भक्ती आणि पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची आध्यात्मिक, भक्तीपरंपरा आहे. सर्व जाती, धर्म, पंथांच्या वारकरी माऊलींना एकत्र आणणारी, स्त्री-पुरुष समानतेचे दर्शन घडवणारी, महाराष्ट्राच्या मातीला एकता, समता, बंधुतेचा विचार देणारी, सांस्कृतिक, वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणारी पांडुरंगभक्तीची, आषाढीवारीची पताका अशीच डौलाने उंच फडकत राहूदे असेही म्हटले आहे. (DCM Devendra Fadanvis)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.