हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार; DCM Devendra Fadnavis यांचे शेतकऱ्यांना वचन

40
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार; DCM Devendra Fadnavis यांचे शेतकऱ्यांना वचन

आमच्या सोयाबीन, कापसाची हमीभावात खरेदी व्हावी. त्यांना अधिक दर मिळावा यासाठी आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील ड्युटी वाढवा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी याबाबत शेतकरीहिताचा तत्काळ निर्णय घेतला आणि सोयाबीनचे दर वाढले. या हंगामात हमीभावापेक्षा अधिक दराने सोयाबीन आणि कापसाची खरेदी होईल, असे वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने शेतकऱ्यांना दिले. आमच्या सरकारने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही जाहीररित्या फडणवीस यांनी सांगितले.

(हेही वाचा – Global Cyber ​​Security Index 2024 : भारताने जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांकात मिळवला टियर 1 दर्जा)

पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर शुक्रवारी विशेष कार्यक्रम झाला. यात अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी आपली वचनबद्धता स्पष्ट केली.

(हेही वाचा – Cyber attack : हॅकर्सची नजर सुप्रीम कोर्टावरही; पाकिस्तान नाही तर या देशाचा सायबर हल्ल्यात सर्वात मोठा हात)

फडणवीस (DCM Devendra Fadnavis) म्हणाले, वर्ध्यातील या कार्यक्रमाच्या माध्यमातून पीएम मित्रा पार्कचे भूमिपूजन, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांचा शुभारंभ आणि पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दोन लाख लोकांना मदत मिळत आहे. या एकूणच योजनांचा विचार करता या कार्यक्रमाच्या माध्यमातून साडेसहा लाख कुटुंबांचे चित्र बदलणार आहे. त्यांच्यापर्यंत रोजगार आणि अधिकारिता पोहचणार आहे. जीवनात परिवर्तनाची आस असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संधी निर्माण केली आहे. राज्यात लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार रुपये महिन्याला देत आहोत. यासोबतच लखपती दीदीही तयार करीत असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांना लक्षात आणून दिले.

(हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिक पांड्या रणजी खेळण्यासाठी उत्सुक )

मायक्रो ओबीसींचे जीवन बदलले

इतक्या वर्षांत आमच्या लोहार, सुतार, कुंभार, सोनार, मूर्तिकार, चर्मकार, मिस्त्री, न्हावी, टेलर, धोबी यांचा यापूर्वीच्या सरकारने कधीही विचार केला नाही. या बारा बलुतेदारांचा, मायक्रो ओबीसींचा विचार केला नाही. या सर्वांचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पीएम विश्वकर्मा योजनेतून त्यांना प्रशिक्षण दिले. त्यांचा रोजगार वाढविता यावा म्हणून अर्थसहाय्य देत त्यांचे जीवन बदलविले, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.