-
प्रतिनिधी
मुंबईतील भोईवाडा गाव पुनर्विकास प्रकल्पाला तातडीने गती देण्यात यावी, तसेच मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा, तसेच भोईवाडा पुनर्विकास सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा – Veer Savarkar यांचा अवमान केल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला राहुल गांधींना झटका; समन्स रद्द करण्यास नकार)
भोईवाडा गावचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला असून स्थानिक रहिवाशांनी याबाबत वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला गती मिळालेली नाही. या प्रकल्पाला आता चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी विकासकाला एक संधी देण्याचे निर्देश दिले आहेत.
याठिकाणी काही रहिवाशी अत्यंत धोकादायक इमारतींमध्ये राहात असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिकेने विशेष बाब म्हणून तातडीने पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाकडून याबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी (DCM Eknath Shinde) यावेळी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community