एसीपी,सिनियर पीआय पाठोपाठ मुंबईसह राज्यातील २७ डीसीपीच्या (27 DCP Transfer) बदल्यांचे आदेश गुरुवारी काढण्यात आले आहे. मुंबईतील झोन ५ च्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पुण्यात तर झोन ९ चे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांची राज्याच्या कायदा व सुवस्था सहायक पोलिस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात बदल्यांचे आदेश काढण्यात आले असले तरी गणेशोत्सवानंतर त्यांना बदल्यांच्या जागी सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (DCP Transfer )
राज्यातील विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. या कालावधीत राज्यातील पोलीस दलात मोठ्या प्रमाणात बदल्यांचे सत्र सुरु आहे. आठवड्याभरापूर्वीच सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असताना गुरुवारी मुंबईसह राज्यातील २६ पोलीस उपायुक्तांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आलेलं आहे. मुंबईतील परिमंडळ ५ (झोन ५) च्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे. तसेच परिमंडळ ९चे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांची राज्याच्या कायदा व सुवस्था येथे सहाय्यक पोलीस महानिरिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. (DCP Transfer )
(हेही वाचा – Kashmir मधील रेफ्युजी १ आणि रेफ्युजी २ गावातील जनतेसाठी स्वातंत्र्यानंतर प्रथमच मिळाली वीज; असीम फाउंडेशनचे यशस्वी प्रयत्न)
नागपूरचे पोलीस उपायुक्त निमित्त गोयल यांची मुंबईत बदली करण्यात आली असून पुण्यातील संदीप सिंह गिल यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांची छत्रपती संभाजी नगर येथून अप्पर पोलिसाधिक्षक लोहमार्ग पुणे येथे बदली करण्यात अली आहे.
लक्ष्मीकांत पातेलं नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्र ते पोलीस अधीक्षक सायबर सुरक्षा मुंबई आणि सुधाकर पाठारे ठाणे ते मुंबई शहर येथे बदली करण्यात आली आहे. बदली करण्यात राज्यातील पोलीस उपायुक्त यांच्या बदल्याचे आदेश गुरुवारी जारी करण्यात आलेअसले तरी गणेशोत्सवाच्या नंतर बदल्यांच्या जागी सोडण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (DCP Transfer)
हेही पाहा –