- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर रुग्णालयात (Nair Hospital) वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या सहयोगी प्राध्यापकाला प्रशासनाने निलंबित करून या प्रकरणाची चौकशी महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र प्रमुख अंतर्गत तक्रार समितीकडे सोपवण्यात आलेली असतानाच या रुग्णालयाचे अधिष्ठाता यांची बदली करण्यात आली आहे. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता (डिन) यांची बदली विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी करण्यात आली असून कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांची नायर रुग्णालयात करण्यात आली आहे.
(हेही वाचा – सेवा शुल्कात कपात करणाऱ्या बँकांवर कारवाई; Aditi Tatkare यांची माहिती)
मुंबईतील सेंट्रल स्थित बाई य. ल. नायर रुग्णालय (Nair Hospital) व वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने, रुग्णालयात कार्यरत सहयोगी प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप करून त्याबाबत तक्रार केली होती. रुग्णालय स्तरावरील लैंगिक छळ प्रतिबंधक समितीने या प्रकरणी चौकशी केली. तसेच, ‘कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रमुख अंतर्गत तक्रार समिती व सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र समिती’ यांनी देखील या प्रकरणामध्ये गंभीर दखल घेतली.
(हेही वाचा – Love Jihad : आनंद असल्याचे भासवणाऱ्या आलिमच्या वासनेची ‘ती’ ठरली शिकार, न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा)
याबाबत विद्यार्थिनींनी तक्रार केल्यानंतरही नायर रुग्णालयाचे (Nair Hospital) अधिष्ठाता यांनी लक्ष दिले नाही याबाबतही यापूर्वीच्या चौकशी समितीने मत नोंदवले होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याने नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांची बदली कुपर रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदी करण्यात आली आहे. तर कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांची बदली नायर रुग्णालयात करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community