मुंबईतील मृतांचा आकडा एक अंकी!

मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ५४३ दिवसांवर आला आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या मागील चार दिवसांपासून नियंत्रणात सोमवारी, ७ जून रोजी संपूर्ण दिवसभरात जिथे ७२८ रुग्णांची नोंद झाली होती, तिथे मंगळवारी ६७३ रुग्ण आढळून आले. संपूर्ण दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

७ रुग्णांचा मृत्यू!

मंगळवारी संपूर्ण दिवसभरात ७५१ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर संपूर्ण दिवसभरात २६ हजार ९९२ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर मंगळवारपर्यंत १५ हजार ७८३ रुग्णांवर उपचार सरु आहेत. सोमवारी जेथे २८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती, तिथे मंगळवारी ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५ रुग्ण हे दीर्घकालिन आजाराचे आहेत. यामध्ये ६ पुरुष आणि १ महिला रुग्णाचा समावेश होता. यामध्ये ६० वर्षांवरील५ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या २ एवढी होती. सोमवारी, ७ जूनपासून मुंबईत अनलॉक सुरु झाले, अशा वेळी रुग्ण संख्या कमी होत आहे, हे सकारात्मक बाब आहे.

(हेही वाचा : आता म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा काळाबाजार! ५ जणांना अटक! )

रुग्ण दुपटीचा दर ५४३ दिवसांवर आला!

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ५४३ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ९८  इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपटी व चाळींची संख्या ही २७ एवढी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here