मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सरकारने धर्मांतर (Conversion) करवणाऱ्यांविरोधात कठोर पाऊल उचललं आहेत. राज्यामध्ये धर्मांतर करवणाऱ्यांना आता फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव (Dr. Mohan Yadav) यांनी ही घोषणा केली आहे. या निर्णयाबाबत माहिती देताना मोहन यादव म्हणाले की, धार्मिक स्वातंत्र्य अधिनियमाच्या (Religious Freedom Restoration Act) माध्यमातून आम्ही जे धर्मांतर (Conversion) करवतील, त्यांच्यासाठीही फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करत आहोत.
( हेही वाचा : Amrit Bharat Station Scheme अंतर्गत कुर्ला स्टेशनच्या सुधारणा प्रकल्पास विलंब)
यादव (Dr. Mohan Yadav) यांनी पुढे सांगितले की, धर्मांतर (Conversion) आणि गैरवर्तनाच्या कुठल्याही व्यवस्थेविरोधात सरकारने संकल्प केला आहे. आम्ही समाजामध्ये या कुप्रथांना प्रोत्साहित करणार नाही. तसेच लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्यांविरोधातही सरकारची सक्त भूमिका आहे. त्यामुळे आम्ही फाशीच्या शिक्षेची (Death penalty) तरतूद केली आहे. आमचं सरकार जबरदस्तीने आणि फसवून दुराचार करणाऱ्यांना सोडणार नाही. आम्ही कुठल्याही परिस्थितीत अशा व्यक्तींना जिवंत राहण्याचा अधिकार देणार नाही.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community