देशात कोरोनाचा कहर इतका वाढत चालला आहे की देशभरात मृत्यूचे तांडव सुरु आहे का, अशी शंका यावी, इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसागणिक देशात मृत्यूचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी, ७ मे रोजी देशात ४ हजार १८७ इतकी नोंद झाली आहे. त्यामुळे वाढता मृत्यू दर ही चिंतेची बाब बनत चालली आहे.
मृत्यू दर वाढण्याचा इशारा!
याआधीही आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांनी भारतात कोरोनाचा प्रकोप वाढत राहणार आहे, त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढणार आहे, असा इशारा दिला होता. त्यानुसार भारतात मृत्यूची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत ४ हजारांहून अधिक मृत्यू देशासाठी चिंताजनक बाब बनली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मागील २४ तासांत देशभरात ४ लाख १ हजार ७८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख १८ हजार ६०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे देशात पहिल्यांदाच ४ हजार १८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ३८ हजार २७० इतकी झाली आहे.
(हेही वाचा : कोणती स्मशानभूमी रिकामी आहे? नाशिक महापालिका देणार पोर्टलद्वारे माहिती )
का वाढतायेत मृत्यू?
देशात मृतांच्या संख्येत सर्वाधिक सह्व्याधी असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. अशा रुग्णांना ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज पडत आहे. त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सह्व्याधी असलेल्या रुग्णांचा मृत्यू होत आहे. तसेच यात आता काही प्रमाणात तरुण रुग्णांचीही संख्या वाढलेली आहे. ही देशासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.
Join Our WhatsApp Community