मुंबईत मृतांचा आकडा घटतोय…

दिवसभरात ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ३४ रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते.

मुंबईत मंगळवारी ४ हजार १४ रुग्ण आढळून आले. मात्र, ही संख्या मागील काही वाढणाऱ्या संख्येपेक्षा नियंत्रणात भासणारी वाटत आहे. ही संख्या कमी वाटत असली तरी मागील तीन दिवसांपासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण देखील घटलेले आहे. त्यामुळे या कमी झालेल्या चाचण्यांमुळेच कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी होत असल्याचे बोलले जात आहे. पण मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी म्हणजे आजवर सत्तरीच्या आसपास असणारा मृत्यूचा आकडा आज साठीच्या आतमध्ये आलेला पहायला मिळत आहे.

27 एप्रिलची आकडेवारी

सोमवारी दिवसभरात एकूण ८ हजार २४० रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर ४ हजार १४ नवे रुग्ण आढळून आले. मंगळवारपर्यंत ६६ हजार ४५ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. मात्र सोमवारी जिथे दिवसभरात केवळ २८ हजार ३२८ चाचण्या करण्यात आल्या होत्या, तिथे मंगळवारी ३० हजार ४२८ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. दिवसभरात ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ३४ रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते. यामध्ये ३५ पुरुष व २४ महिला रुग्णांचा समावेश आहे. यातील ३ रुग्ण हे ४० वर्ष वयोगटाच्या खालील आहेत. तर ३२ रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील आहे. ४० ते ६० वयोगटातील मृतांचा आकडा हा २४ एवढा आहे.

(हेही वाचाः आदित्य बोले, चहल डोले! २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र!)

अशी आहे स्थिती

मुंबईत साोमवारी रुग्ण दुप्पटीचा दर हा ६२ दिवसांवर होता, तिथे तो मंगळवारी ६८ दिवसांवर आला आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ८७ टक्के, तर कोविड वाढीचा दर हा १.०१ टक्के आहे. मंगळवारपर्यंत जास्त लक्षणे असलेल्या व चिंताजनक झालेल्या २१ हजार ७०६ रुग्णांवर विविध ठिकाणच्या कोविड रुग्णालयांमध्ये तसेच कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

मंगळवारी आजवरचे सर्वाधिक लसीकरण

सोमवारी दिवसभरात जिथे एकूण ४५ हजार ३२६ जणांचे लसीकरण पार पडले होते, तिथे मंगळवारी दिवसभरात ७२ हजार ६०६ जणांचे लसीकरण पार पडले. मुंबईतील हे आजवरचे सर्वाधिक लसीकरण ठरले आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिवसाला १ लाख नागरिकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे. मंगळवारी झालेल्या एकूण लसीकरणामध्ये  सुमारे ३० हजार ६५४ जणांनी पहिला डोस, तर ४१ हजार ९५२ जणांनी दुसरा डोस घेतला. यामध्ये ४५ ते ५९ वयोगटातील २९ हजार १९४ जणांचे लसीकरण झाले, तर ६० वर्षावरील ३७ हजार २०८ जणाांचे लसीकरण झाले. दिवसभरात आरोग्य विभागाच्या २ हजार ४८४ आणि फ्रंटलाईन वर्करपैकी ३ हजार ७२० जणांचे लसीकरण पार पडले.

(हेही वाचाः माहिम,दादर आणि धारावीतली रुग्णसंख्या येतेय आटोक्यात!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here