गुरुवारी कोरोनाबाधित मृत्यूच्या आकड्यात वाढ

गुरुवारी ४,१९२ नवीन कोरोनाबाधीत रुण आढळून आले.

बुधवारी दिवसभरात एकूण ४ हजार ९६६ रुग्ण आढळून आले होते, तिथे गुरुवारी ४,१९२ रुण आढळून आले. मात्र बुधवारी जिथे ७८ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे गुरुवारी ८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णांचा आकडा कमी जास्त होत असला तरी मृत्यूचा वाढणारा आकडा मुंबईकरांच्या मनात भीती निर्माण करणारा आहे. गुरुवारी दिवसभरात एकूण ६४ हजार १८ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु होते. मात्र दिवसभरात ८२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ५७ रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते. तर यामध्ये ४३ पुरुष व ३९ महिला रुग्णांचा समावेश होता. यातील ३ रुग्ण हे ४० वयोगटाच्या खालील आहेत. तर ५१ रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील होते. आणि ४० ते ६० वयोगटातील मृतांचा आकडा हा २८ एवढा होता.

बुधवारी रुग्ण दुपटीचा दर हा ७४ दिवसांवर आला होता. तो गुरुवारी ७९ एवढा होता. रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ८८ टक्के एवढा होता. तर कोविड वाढीचा दर हा०.८६ टक्के होता. गुरुवारपर्यंत जास्त लक्षणे असलेल्या व चिंताजनक झालेल्या २१ हजार ७६९ रुग्णांवर विविध ठिकाणच्या कोविड रुग्णालयांमध्ये तसेच कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु होते.

(हेही वाचा : राज्यात जुलै-ऑगस्टमध्ये तिसरी लाट येणार!)

झोपडपट्टी, चाळी कंटेन्मेंट झोनची संख्या घटली

मुंबईतील मागील ११४ आकडयांवर सीमित असलेल्या झोपडपट्टी व चाळींच्या कंटेन्मेंटची संख्या बुधवारी १२० एवढी झाली होती. पण गुरुवारी ही संख्या ११५ एवढी झाली आहे, तर मुंबईतील बुधवारपर्यंत सिल करण्यात आलेल्या १,११४ इमारतींच्या तुलनेत गुरुवारपर्यंत १,१०१ एवढी झाली होती.

लसीकरण घटले

तीन दिवसांपूर्वी एकाच दिवशी ७२ हजार एवढे लसीकरण करणाऱ्या मुंबई महापालिकेला गुरुवारी केवळ २८ हजार ७८२ एवढेच लसीकरण पार पाडता आले.यामध्ये ११ हजार ५७१ जणांनी पहिला डोस तर १७ हजार २११ जणांनी दुसरा डोस घेतला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here