Debris : मुंबईतील दगड विटांच्या राडारोड्याची विल्हेवाट; आता नेमला सल्लागार

178
Debris : मुंबईतील दगड विटांच्या राडारोड्याची विल्हेवाट; आता नेमला सल्लागार

मुंबईतील इमारत बांधकामांसह रस्त्यांच्या कडेला पडलेल्या राडारोड्याच्या विल्हेवाटीसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने अखेर कंत्राटदारालाच जागेचा शोध घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. या २० वर्षांकरता निवड केलेल्या दोन कामांसाठी सुमारे दोन हजार ५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. मात्र, या कामावर देखरेख ठेवण्यासाठी आता तब्बल अडीच कोटी रुपये खर्च केले. (Debris)

मुंबईतील किरकोळ घरदुरुस्तीमधून दैनंदिन निर्माण होणारा राडारोडा अर्थात डेब्रीज (Debris) निर्माण होता. हा राडारोडा हटवण्यासाठी महापलिकेच्या माध्यमातून डेब्रीज ऑन कॉल सेवेमार्फत माफक दरात सशुल्क सेवा दिली आहे. या राडारोड्यामुळे मुंबई अस्वच्छता पसरुन नागरिकांना त्रास निर्माण होत असल्याने सर्व प्रथम मुंबईतील १२०० मेट्रीक टन दगड विटांच्या राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राटदाराच्या माध्यमातूनच जागा निर्माण करून हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत महापालिकेने मागवलेल्या निविदेमध्ये शहर व पूर्व उपनगरांसाठी मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट या कंपनीची निवड करण्यात आली आहे. तर पश्चिम उपनगरासाठी एजी एन्व्हायरो इन्फाप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांची निवड झाली असून या दोन्ही गटांच्या प्रकल्प कामांसाठी १०३१.८९ कोटी रुपये तसेच १०२४.६६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. शहर आणि पूर्व उपनगरांसाठ मेट्रीक टनामागे १४२४ रुपये आणि पश्चिम उपनगराच्या डेब्रीजच्या मेट्रीक ट्रन १४१५ रुपये मोजले जणार आहेत. प्रत्येक वर्षी या मेट्रीक टनाच्या दरावर पाच टक्यांनी वाढ २० वर्षांमध्ये केली जाणार आहे. (Debris)

(हेही वाचा – Rizvi College: पिकनिकसाठी गेलेल्या मुंबईतील कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा रायगडमध्ये बुडून मृत्यू!)

या प्रकल्पाकरता कंत्राटदाराची निवड करण्यात आल्यानंतर या प्रकल्प कामाच्या देखरेखीकरता सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. डिएनपी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ३ वर्षांच्या कालावधीकरता सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या राडारोडा प्रक्रिया करण्याचे प्रकल्प मुंबईत प्रथमच राबवण्यात येत असल्यामुळे या कामांसाठी स्वतंत्र सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. (Debris)

यापासून बनवले जाणार पेव्हर ब्लॉक, रस्ते दुभाजक

या कामांसाठी नेमलेल्या संबंधित कंपनी ही मुंबईतील डेब्रीज उचलून नेत त्यावर प्रक्रिया करेल आणि त्याचे वर्गीकरण करत त्यापासून पेव्हर ब्लॉक किंवा रस्ते दुभाजक तथा बसण्याची आसने बनवले जातील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Debris)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.