Tomato Import : टोमॅटोच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी नेपाळमधून आयातीचा निर्णय

Tomato Import : भारतात टोमॅटोच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी भारताने नेपाळमधून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि अशा टोमॅटोची पहिली ऑर्डर या आठवड्‌यातच भारतात पोहोचणार आहे.

147

मागच्या तीन महिन्यांत टोमॅटोच्या किमती देशात गगनाला भिडल्या आहेत. सरकारी बाजारपेठांमध्ये टोमॅटोने विक्रमी किलोमागे १४० रुपयांचा आकडा गाठला होता. तर देशाच्या काही भागांमध्ये टोमॅटो १६० रुपये प्रती किलो दरानेही मिळत आहे.

भारतात कांद्यानंतर टोमॅटो या फळभाजीला सर्वाधिक मागणी असते. अशा वेळी टोमॅटोचेच दर वाढल्याने सर्वसाधारण घरगुती बजेट मागच्या तीन महिन्यांत बिघडलेलं आहे. अशावेळी टोमॅटो शेजारच्या नेपाळमधून आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. नेपाळमधून मागवलेली पहिली टोमॅटोची ऑर्डर शुक्रवारी भारतात पोहोचणार आहे आणि वाराणसी, लखनऊ तसंच कानपूर या शहरांमध्ये शनिवार किंवा रविवारपर्यंत हा टोमॅटो पोहोचेल, असंही सीतारमण यांनी संसदेत बोलताना स्पष्ट केलं आहे.

(हेही वाचा PM Narendra Modi : फिल्डिंग विरोधकांनी लावली; आम्ही चौकार-षटकार मारले – पंतप्रधान मोदी)

अनियमित आणि लांबलेल्या पावसामुळे यंदा टोमॅटोच्या देशांतर्गत उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मागच्या दोन महिन्यात टोमॅटोचे दर तब्बल १४०० टक्क्यांनी वाढले. अनियमित पावसाबरोबरच वाढतं तापमान आणि टोमॅटो पीकाला लागलेली किड ही कारणं टोमॅटोच्या कमी उत्पादनासाठी देण्यात येत आहेत.

दरम्यान केंद्रसरकार हल्ली अन्नधान्याच्या पुरेशा साठ्याबद्दल जागरुक आहे. या वर्षाच्या शेवटी असलेल्या राज्यांतील निवडणुका आणि पुढच्या वर्षी असलेल्या सार्वत्रिक निवडणुका याच्या पार्श्वभूमीवर महागाई आटोक्यात आणण्याला सरकारने प्राधान्य दिलं आहे. आणि त्यामुळे गरज असेल तिथे भारतातून गहू तसंच तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. गव्हाच्या आयातीवरही सरकारचा विचार सुरू आहे. तसंच टोमॅटो आयातीचा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.